Nojoto: Largest Storytelling Platform

दिप अमावश्येच्या हार्दिक शुभेच्छा! तु गुरुमाऊली॥

दिप अमावश्येच्या हार्दिक शुभेच्छा! 

तु गुरुमाऊली॥ शेगावीच्या राणा॥
जय गजानना ॥ नाम घेऊ॥१॥

तुझ्या गजराने॥ निनादते गाव॥
भक्तीचाच भाव॥ मनी वसे॥२॥

दुमदुमते रे॥ नाम तुझे देवा॥
शेगावी त्या यावा॥पहावया॥३॥

नाम रोज घेतो॥ चिंतन करतो॥
ह्रदयी बसवितो॥ छबी तुझी॥४॥

गण गणात बोते🙏जय गजानन 🙏🌷

मोहन सोमलकर

©Mohan Somalkar
  # जय गजानन

# जय गजानन #मराठीकविता

27 Views