Nojoto: Largest Storytelling Platform

खरं बोलायचं नसतं मला ही पण मी बोलून जातो.. बोलताना

खरं बोलायचं नसतं मला ही
पण मी बोलून जातो..
बोलताना बऱ्याच वेळा
सर्वांचं हृदय तोडून जातो..

मनातलं  बोलल्याविना
मनाला माझ्या राहवत नाही..
चुकांचा पाढा वाचत 
उगाच कुणाला सतावत नाही..

चुकांमधून शिकायचं असतं 
कायम अपेक्षित असतं मला..
हेतूपोटी चिडलेल कधीही 
 समजून घ्यायचं नसतं तुला..

दरवेळी सांगायला तुला
आता तू लहान नाही...
 तुझं चुकतं तसं माझं चुकतं
मी ही इतका महान नाही..

शिकायचं की रुसायचं 
ज्याचं त्याने ठरवायचं..
हेतुला न समजता
उगाच दोष का देत बसायचं..

उगाच दोष का देत बसायचं..

©गोरक्ष अशोक उंबरकर
  हुरहूर