Nojoto: Largest Storytelling Platform

चंद्र* ढगांची लपवा छपवी बाजुला सारुन चांदण्याच्य

चंद्र*

ढगांची लपवा छपवी बाजुला सारुन 
चांदण्याच्या गर्दीतुन दिसुन आला 
तुझ्या आठवणीतला पाहुण चंद्र 
हर्ष डोळ्यात मावेनासा झाला

 हळुच चंद्राचे ते डोकावून पहाणे 
आठवणीचे तुझ्या सुर नवे 
रोज तुला न्याहाळन्यास मला 
लखलख चांदण्याचे नभांगण हवे

शांत शितल तुझे चांदणे 
मनाच्या चांदणीला जोडणारे दुवे 
चंद्रिका कधी पसरती चांदवेली 
त्या वेलीखाली  प्रेमगीत गावे

आभाळ तारकांचे पांघरुण जरा 
वाटे मनास घ्यावा जरा विसावा 
ही रात्र धुंद वेडी रंगात चिंब व्हावी 
चंद्रात तुझा चेहरा हासरा दिसावा

स्वप्नातल्या सुखांना तेव्हाच जाग यावी 
नभात चांदण्यांची उधळण व्हावी 
चंद्राच्या स्पर्शाने चंद्रीका लाजुन जावी 
तुझ्या सोबतीने सर्व सुख उपभोगावी

दुर्गा देशमुख

©Durga Deshmukh
  चंद्र

चंद्र #मराठीकविता

54 Views