Nojoto: Largest Storytelling Platform
durgadeshmukh6892
  • 53Stories
  • 21Followers
  • 611Love
    1.1KViews

Durga Deshmukh

  • Popular
  • Latest
  • Video
80028f429c3b98fba6d2372e383a5e6f

Durga Deshmukh

तरुण पणी दिला लाथा बुक्याचा मारा 
म्हातारपणी ती थकलेल्या नव-याचा पाय होती 

दुर्गा देशमुख

©Durga Deshmukh
  #streetlamp शायरी
80028f429c3b98fba6d2372e383a5e6f

Durga Deshmukh

माथ्यावर बहिण ती
टाके तांदुळ अक्षदा  
गोड लाडु भरी मुखी 
ताई आशिर्वाद सदा

©Durga Deshmukh
  #streetlamp शायरी
80028f429c3b98fba6d2372e383a5e6f

Durga Deshmukh

भुललास तु किती लवकर 
पाहुन माझ्या गालावरचा तीळ सख्या 
माझ्यावर तुझी खिळली नजर 
दाखवायला घालतो तु शीळ सख्या 

दुर्गा

©Durga Deshmukh
  #streetlamp शायरी
80028f429c3b98fba6d2372e383a5e6f

Durga Deshmukh

समजुन नाजुक वेल मला तु 
देऊ नकोस आधार डीळ सख्या 
तुझ्यात होऊन एकरुप मी अशी 
गुरफटुन टाकील तुला माझा पीळ सख्या 

दुर्गा देशमुख

©Durga Deshmukh
  #PhisaltaSamay शायरी
80028f429c3b98fba6d2372e383a5e6f

Durga Deshmukh

गेले मिळुन तुझ्यात अशी मी 
ओढ अशी पाहुन चंद्र ही हसावा

हात तुझ्या हातात या चांदण्या राती 
प्रेम असे की घडीभर चंद्र ही विसावा

©Durga Deshmukh शायरी

13 Love

80028f429c3b98fba6d2372e383a5e6f

Durga Deshmukh

पाऊस 

 पाऊस हा क्षणाचा बंधन युगायुगाचे 
चांदण्यात फुललेले प्रेम तुझे माझे

 चालतात श्वास तोवर ऐकमेकास जीव लावु 
प्रसंग येता एखादा जोडीन श्वास माझे

नेहमीच आपल्या वसंत स्वागताला 
मानु चल आज आभार श्रावणाचे

प्रेमाची सावली शोधण्या बेजार झालो दोघे 
सांभाळुन घेतले उपकार त्या उन्हाचे

किती खटाटोप केला तुला भेटण्यासाठी 
झाली भेट तर जगु जीवन माणसाचे

©Durga Deshmukh
  #Broken पाऊस
80028f429c3b98fba6d2372e383a5e6f

Durga Deshmukh

भावना उचंबळून येतात तेव्हा 
डोळ्यात येऊन बसतो पाऊस 
आनंदाने मन भरुन येताना 
गालावर हळुच नाचतो पाऊस 1

आठवणीत तुझ्या सख्या 
डोळ्यात थिजुन बसतो पाऊस 
कधी रडवतो खुप मनाला 
कधी ह्दयात हसतो पाऊस 2

सांगता येत नाही वेदना तेव्हा 
मुका होऊन बसतो पाऊस 
रात येते तुझ्या शिवाय 
विरहाने व्याकुळ डसतो पाऊस 3

अंगावर पडता रिमझिम धारा 
मनात माझ्या ठसतो पाऊस 
चिंब चिंब भिजुन मला 
बाहुत तुझ्या कसतो पाऊस 4

 कधी हसवतो कधी रडवतो 
कधी वेडाच असतो पाऊस 
तुझ्या आठवणीत रडुन सुद्धा 
कधी येत नसतो पाऊस 5

दुर्गा देशमुख
दि 7/9/2023

©Durga Deshmukh
  #Broken
80028f429c3b98fba6d2372e383a5e6f

Durga Deshmukh

आरोग्य धनसंपदा 

ध्यान धारणा ही ,शांतता मनाची 
आरोग्य धनाची, गुरुकिल्ली ||

सात्विक आहार, कंद मुळा भाजी 
खावी रोज ताजी, सर्वकाळ ||

ॠषीतुल्य झाड, पिंपळ उंबर 
वड हो अंबर, महाराजा ||

वृक्ष करीतसे, धरती श्रृंगार 
ही हिरवीगार, दिसतसे ||

पहाटे उठणे, करा रोज योग 
सरतील भोग, शरीराचे ||

शुद्ध हवा पोटी, रोग हे सरेल 
आनंद भरेल, गगणात ||

राखा तुम्ही वन,आरोग्याची खाण
असु द्या ही जाण, वेळोवेळी ||

स्वच्छता राखा, लावा विल्हेवाट 
कच-याचा थाट,निर्माल्यात ||

गर्दी ही लोकाची, झाली दाटीवाटी 
खायला ही थाटी, मिळेनासी ||

अन्नधान्य वाढ,वापर खताचा 
हिशोब शेताचा, बघतसे ||

रोग आमंत्रण, खाण्यातुन होते 
जपा तुम्ही शेते, रात्रंदिन ||

झाडाचे महत्व, जाणा तुम्ही सर्व 
लागवड पर्व, कार्यारंभ ||

पर्यावरणाचा, समतोल राखा 
उभा पाठीराखा, वृक्षराजा ||

आता पाळा तुम्ही, गतिविधी पर्व 
संगोपण सर्व, करितसे ||

नद्याचे पावित्र्य, राखा सर्व जन 
करु नका घाण, निर्माल्याचे ||

नदीतले दिवे, अज्ञानाची पुडी 
उजेडाचा गुढी,  गावामधी ||

देव धर्म कर्म, करुन बाजार 
सर्वच बेजार, करुनका ||

जडी बुटी धन ,आरोग्याचा ठेवा 
मिळतसे मेवा, वनातुन ||

दुर्गा देशमुख, परभणी
दि 29/3/2023

©Durga Deshmukh
  #Broken
80028f429c3b98fba6d2372e383a5e6f

Durga Deshmukh

तुझ्या विरहाचे दुःख, रोजच मनी साठते 
माझ्या जवळ बस,जरा बरे वाटते

शिशिर यातना सोसुन, वसंत पालवी फुटते 
माझ्या जवळ बस ,जरा बरे वाटते

आठवणीचे तुझ्या, मनी काहुर दाटते 
माझ्या जवळ बस ,जरा बरे वाटते

अंधारी रात ही ,मज खायला उठते 
माझ्या जवळ बस ,जरा बरे वाटते

माझ्या जवळ बस जरा बरे वाटते
जगण्यात आनंद आहे, हे खरे वाटते


माझ्या मनातले  भाव 
जाणले तु ग कसे 
गाठ बांधली जन्मातरीची 
मनोमनी तुच भासे

गाऊनी नाचुनी रंग उधळुनी 
साजरा करुया सण होळी 
तुझ्या ह्रदयातील प्रेमाने 
भरु दे माझ्या प्रेमाची झोळी

©Durga Deshmukh
  #myhappiness
80028f429c3b98fba6d2372e383a5e6f

Durga Deshmukh

सुमे चल माझ्या शाळेला जाऊ 
ज्ञानोपासक पाहुण येऊ 

शाळा माझं गाव 
ज्ञानोपासक त्याच नाव 
ज्ञानाची घागर भरुन घेऊ 1

ज्ञानोपासक माझी शाळा 
ज्ञानान भरलेला मळा 
नका रिकाम्या हातान जाऊ 2

पहा विज्ञानाचे रंग 
मुल रसायनात दंग 
थोडा जीवाचा रंग घेऊ (3

विद्वान विद्वत्तेची खाण 
गुरुजनाची प्रतिमा महान 
चला ज्ञानाची गाणी गाऊ 4

चित्रकला, रांगोळी, ध्यान 
दंगामस्ती, अनापान 
कला सा-या जगाला दावु 5

शाळा गुणवत्तेचा सागर 
अंधश्रध्देवर फिरवी नांगर 
उघड्या डोळ्यानं विज्ञान   पाहु(6)

दुर्गा देशमुख, परभणी

©Durga Deshmukh
  शाळा

36 Views

loader
Home
Explore
Events
Notification
Profile