Nojoto: Largest Storytelling Platform

वंदन गणेशाला सुंदर ते रुप | बसे पाटावरी लाडु हात

वंदन गणेशाला

सुंदर ते रुप | बसे पाटावरी 
लाडु हातावरी | घेऊनिया ||1

सुंदर मुकुट | चंदनाचा टिळा 
पायामध्ये वाळा | घाऊनिया ||2

बुद्धीचे प्रतिक | उंदिर वाहन 
पहिलाच मान | गणेशाला ||3

शक्तीचे प्रतिक | वक्रतुण्ड रुप 
शंकराचा सुत | विनायक ||4

कार्याचा आरंभ | गणेश पुजन 
करीती भजन | सुखकर्ता ||5

देवा दुःखहर्ता | पुरविशी आस 
दर्शनाचा ध्यास | चिंतामणी ||6

विश्वाचा कैवारी | दुबळ्याला तारी 
सुखाची ही स्वारी | करतसे ||7

मोदक आवडे | जास्वंद हे लाल 
दुर्वा न गुलाल | आवडते ||8

दुर्गा देशमुख

©Durga Deshmukh वंदन गणेशाला
वंदन गणेशाला

सुंदर ते रुप | बसे पाटावरी 
लाडु हातावरी | घेऊनिया ||1

सुंदर मुकुट | चंदनाचा टिळा 
पायामध्ये वाळा | घाऊनिया ||2

बुद्धीचे प्रतिक | उंदिर वाहन 
पहिलाच मान | गणेशाला ||3

शक्तीचे प्रतिक | वक्रतुण्ड रुप 
शंकराचा सुत | विनायक ||4

कार्याचा आरंभ | गणेश पुजन 
करीती भजन | सुखकर्ता ||5

देवा दुःखहर्ता | पुरविशी आस 
दर्शनाचा ध्यास | चिंतामणी ||6

विश्वाचा कैवारी | दुबळ्याला तारी 
सुखाची ही स्वारी | करतसे ||7

मोदक आवडे | जास्वंद हे लाल 
दुर्वा न गुलाल | आवडते ||8

दुर्गा देशमुख

©Durga Deshmukh वंदन गणेशाला

वंदन गणेशाला #मराठीकविता