Nojoto: Largest Storytelling Platform

सुखाच्या शोधात माणुस जगणं विसरून जातो, गरजा पुर्ण

सुखाच्या शोधात माणुस 
जगणं विसरून जातो,
गरजा पुर्ण करताना
आयुष्य झिजवून घेतो।।१।।

अखेर समाधान म्हणजे
असते तरी काय?
कोणी सांगेल का जरा
यासाठी मार्ग नेमका काय?।।२।।

गरीब समाधानी नाही कारण
त्याची पोटाची खळगी भरत नाही,
श्रीमंतही समाधानी नाही कारण
त्याला परीवारासाठी वेळ नाही।।३।।

एक आहे तर एक नाही
अशी आहे ही सारी व्यथा,
तुमचं आमचं काय म्हणता राव
साऱ्यांची एक सारखीच कथा।।४।।

©Dr Mangesh Kankonkar #व्यथा
सुखाच्या शोधात माणुस 
जगणं विसरून जातो,
गरजा पुर्ण करताना
आयुष्य झिजवून घेतो।।१।।

अखेर समाधान म्हणजे
असते तरी काय?
कोणी सांगेल का जरा
यासाठी मार्ग नेमका काय?।।२।।

गरीब समाधानी नाही कारण
त्याची पोटाची खळगी भरत नाही,
श्रीमंतही समाधानी नाही कारण
त्याला परीवारासाठी वेळ नाही।।३।।

एक आहे तर एक नाही
अशी आहे ही सारी व्यथा,
तुमचं आमचं काय म्हणता राव
साऱ्यांची एक सारखीच कथा।।४।।

©Dr Mangesh Kankonkar #व्यथा