Nojoto: Largest Storytelling Platform

कविता :: #भाव माझा चारोळीचा कवितेत मांडतो भाव मा

कविता :: #भाव माझा चारोळीचा कवितेत मांडतो 

भाव माझा चारोळीचा कवितेत मांडतो मी  
बोलक्या या दुनियेत माझ्या ओठांना बांधतो मी 
बोलणाऱ्या ओठांपेक्षा भावनेला साद घालतो मी
शब्दांच्या बाजीगर असलेल्या गर्दीत नयनभाव शोधतो मी
शब्दाने पटाईत भावशून्य असल्या लोकांमधून सुटून
एकांत शोधतो मी.....

अश्रु माझे नयनात दाटले भावनेच्या वेदना रक्तात माखले....
हरवलेला भाव सापडला ओळींत हरवलेला शब्द शोधतो मी .....
लंकेत माझा राम शोधतो मी..
मुक्या माझ्या शब्दांना रटनारा मी पंडित शोधतो 
भावनेला माझ्या समजून घेणारा पांडित्य शोधतो मी....
पुराणांना समजण्या इतपत बुध्दी तल्लख नाही
माझी....
तरीही जन्माला तारणारा चालीसा शोधतो मी..

लंकेत माझा शब्दभाव अडकला रावणाच्या तावडीतून सुटका करणारा पवनपुत्र शोधतो मी 
माझ्या काव्य भावाला शीर्षक देणारा राम शोधतो मी....
जीवन हा गुंतागुंतीचा धागा जणू , गुंता काढणारा आणि नयनाला न दिसणारा माझा नारायण शोधतो मी.....
भावनेला माझ्या ओळीत मांडून....एक एक शब्दांचा माळ ओवतो मी
कच्या - पक्या शब्दांना भावनेत अडकवून अनुभवांचा रस घोळतो मी

चारोळीत संपविण्या इतकी लहान संकटे नाहीत माझे
म्हणून त्याला  कवितेचा रूप देतो मी ...तस मूका मी बोलाने 
वहीवर शब्दांना दूर ओढतो मी. विचारांना माझ्या कवितेत मांडतो मी
म्हणून माझ्या कवितेला समजून घेणारा काव्यप्रेमी समाज शोधतो मी

शब्दांना दूर ओढण्याचा छंद माझा
म्हणून माझ्या विचारांना चारोळीत मांडणारा चारोळी कार शोधतो मी......
चिखलात माझे विचार भरले ...
गंगाजल नी निर्मल करणारा सखा कृष्ण शोधतो मी ..

  माझ्या भावना विचारांना समजून घेणारा मुका पंडित
मला भेटला .....
तो माझ्या भाव - विचारांना  संस्कृत श्लोकांत  मांडला 
माझ्या भाव आणि विचारांना समजून त्याने ग्रंथ लिहिला
 इंग्लिश बोलक्यांची गर्दी ही सारी , संस्कृत समझे न कुणा 
संस्कृत समजणारा मित्र मला मिळाला , तो मातृभाषेत भाषांतर जरी केला ..
विचारांचा हा मोठा ग्रंथ वाचणारा वाचणप्रेमी भावसंपन्न वाचक शोधतो मी....

जरी माझ्या मुक्या भावनांना समजून घेणारा पंडित मिळाला
जरी संस्कृत प्रेमी मित्र मला मिळाला 
त्याने जरी भाषांतर केले , तरी हा मोठा ग्रंथ वाचेल कोण....?
म्हणून मुक्या भावनांना समजून माझ्या विचारांना चारोळी त मांडणारा 
 मित्र शोधतो मी ....
शब्दांना दूर खेचतो , भाव माझ्या चारोळीचा कवितेत मांडतो मी
कवितेला माझ्या चारोळीत मांडणारा चारोळी कार मित्र शोधतो मी..✍️

कवी :: धर्मेंद्र वि . गोपतवार
लेखक / कवी_ :: कवि-मन _मनातलं ओझ् पानावर

©Dharmendra Gopatwar #कवितेतमांडतो