Nojoto: Largest Storytelling Platform

अंगणात माये किती पडतो पाऊस जावू दे बाहेर, सर्दी ना

अंगणात माये किती पडतो पाऊस
जावू दे बाहेर, सर्दी नाही ना होत..

छपरावर धारा आल्या दुडुदूडू धावत
घसरंडा उंबऱ्यात धर ना माझा हात

सांग वल्ली कसी गं होतील कापडं
काढून सदरा इजार, घालतो लंगोट

धुवून गेले रस्ते बघ झाले चकाचक
सोडू दे ना नाव या वाहत्या पाण्यात

अंगणात माये किती पडतो पाऊस
जावू दे बाहेर, सर्दी नाही ना होत..

©Dileep Bhope
  #पाऊस