Nojoto: Largest Storytelling Platform

मन माझे धुंद ॥ आत्मा हा मिलिंद ॥ लागला हा छंद ॥ गी

मन माझे धुंद ॥ आत्मा हा मिलिंद ॥
लागला हा छंद ॥ गीत गाण्या॥१॥

गुरुवर्य माझे॥ कुठे ठाव नाही ॥
फिरे दिशा दाही ॥ मन माझे॥२॥

ह्दयात बसली॥ मूर्ती त्या गुरुंची॥
लाभे ती दयेची ॥ प्रतिभा ती॥३॥

येती समीप ते॥ गुरुवर्य माझे॥
कमी होई ओझे॥ मनाचे या॥४॥

मोहन सोमलकर

©Mohan Somalkar
  #अभंग