Nojoto: Largest Storytelling Platform

बैलपोळा नाळ रक्ताची नाही ती आहे शंकराच्या भक्ता

बैलपोळा 

नाळ रक्ताची नाही 
ती आहे शंकराच्या भक्ताची
महादेवाच्या आधी 
पुजतो त्या नंदीची! 

नंदीबैल आणि बैलाचे 
नाते ते बळीराजाचे 
मातीशी आहे अन
मातीतल्या पिकाचे!

घामाची धार मातीत पडते
मोत्याचा दाणा कणसात भरते
नाते जमिनीशी बळीराजाचे 
अन मुक्या प्राणांचे जुडते! 

उन,वादळ, पावसात 
सोसाट्याच्या थैमानात 
नाही डगमगत कधी
बैलाची जोडी आयुष्यात! 

संस्कृती महाराष्ट्राची 
परंपरा या राष्ट्राची 
टिळा अक्षदेचा लावा 
पुजा करा बैलजोडीची! 

पूरणपोळीचा नैवेद्य चारा 
ओवाळा त्यापुढे पंचारती 
आयुष्यभर झाल्या गती
भुईत चालुन केली प्रगती !

एक दिवस त्याचा
बैलजोडी आज पोळा 
विश्रांती त्याला द्या 
सण साजरा करा आगळा!

मोहन सोमलकर

©Mohan Somalkar
  #बैल