Nojoto: Largest Storytelling Platform

तु माझा देव मी तुझा भक्त तु येडा गबाळा मी मात्र

तु माझा देव 
मी तुझा भक्त 
तु येडा गबाळा 
मी मात्र सक्त 

तु माझा राजा 
मी तुझी राणी 
तु माझा गुलाब 
मी तुझी फुलदाणी 

तु माझे झाड 
मी तुझे फुल 
तु गुबुगुबु नंदीबैल 
मी त्यावरील झुल 

तु माझा तलाव 
मी तुझा सागर 
तु माझी पवरा 
मी तुझी घागर 

 तु माझे अंगण 
मी तुझी तुळस 
तु माझे मंदिर 
मी तुझा कळस 

दुर्गा देशमुख

©Durga Deshmukh
  तु मी

तु मी #मराठीकविता

99 Views