Nojoto: Largest Storytelling Platform

मायेचा डोंगर कोण्या त्रासनं त्रासनं..माय ग्रासली

मायेचा डोंगर 

कोण्या त्रासनं त्रासनं..माय ग्रासली  ग्रासली
कोण्या प्रेमानं प्रेमानं..माय डोंगर चढली ||धृ ||

माझ्या मायेची हो महती 
तेथी देव ही नाहती 
दुःखं स्वतः हो भोगूनि 
सुखं जगाला या देती 
घराघरात घरात..प्रेम माया हो भरली 
त्या प्रेमाची प्रेमाची..चव आम्ही हो चाखली 
कोण्या प्रेमानं प्रेमानं..माय दाटून भरली||1||

ह्या मायेची पाखरं 
उडती आकाशी भरभरं 
त्यांच्या तेजाचा उजेड 
करती अंधार हो दूर 
या पाखरांना पाखरांना..पंख मायेनी लावली 
का ही लेकरं लेकरं.. आज मायेला विसरली 
त्यांच्या बुद्धीची बुद्धीची..का मती हो खुंटली
कोण्या क्रोधानं क्रोधानं..माय रागीट जाहली 
कोण्या जोरानं जोरानं..माय पेटून उठली 
कोण्या न्यायाला न्यायाला..माय कसून लढली ||2||

किती मायेच्या ह्या दशा 
सांगू तुम्हा हो कशा 
हिरव्या पिकाच्या त्या मुळ्या 
उनाड जमिनी रुतल्या 
जरी मायेचा सागर 
पाण्याने हो भरला 
तिच्या हृदयाचा किनारा
तहानलेला हो राहिला 
तरी आसू दुःखाचा दुःखाचा..तिने हसरा हो बनविला 
तिच्या भावनेचा भावनेचा..का हा दसरा हो चालला 
आज या किनाऱ्याला किनाऱ्याला..गरज लाटेची भासली 
कोण्या तान्हेने तान्हेने..माय कासली कासली  ||3||

माझी माय हो माऊली 
उभ्या जगाची साऊली 
तिच्या विना हो येथी 
नाही कोणीच हो सुखी 
या दिन दुःखितांची  दुःखितांची..तिने पिढा हो हारली 
कोण्या तेजानं तेजानं..माय जागली जागली 
कोण्या त्यागानं त्यागानं..माय समृद्ध ठरली ||4||

कोण्या त्रासनं त्रासनं..माय ग्रासली  ग्रासली..
कोण्या प्रेमानं प्रेमानं..माय डोंगर चढली..

®रामदास नरवाडे पाटील #MothersDay #Mother #आई #कविता #मराठी #India