Nojoto: Largest Storytelling Platform

*शीर्षक :-कौतुक वाढदिवसाचे* मला वाटतं हा वाढदिवसा

*शीर्षक :-कौतुक वाढदिवसाचे*

मला वाटतं हा वाढदिवसाचा दिवस
तर आपला तसा रोजच असतो...
उगवणारा दिवस आंनंदाने घालवायचा बास...

वाढणाऱ्या दिवसाची उजळणी 
केकच्या उरावर मेणबत्त्या मांडून का व्हावी? 
आईने ओवाळले तरी बास..  

उगवत्या दिवसाचा क्षण आणि क्षण 
आनंदाने व्यतीत करणे जमले की 
आणि मन जिंदगीत रमले की बास ...

वय वाढताना विचार आपोआप बदलतात 
त्या बदलणाऱ्या विचारांना 
स्वभावावर नाही आणले की बास...

मनाची गुंतवणूक जमायला हवी 
रोज एका व्यक्तीशी तरी 
क्वालिटी टाईम काढून संवाद साधला की बास... 

सुख दुःखे कालचक्रावर सोडावीत 
आरोग्याला मानसिक आजार 
नाही बळावला तरी बास...

वाढदिवसाला माझी ना नाही
पण पार्टी न देता कधी कधी 
दानधर्म केलात तरी बास ...

असा वर्षातून येणार हा दिवस 
वय आणि वर्षे वाढवतो 
तेव्हा वय वाढले म्हणून पळणे नाही सोडले तरी बास...
 
वाढदिवसाच्या शुभेच्छांच्यामुळे एवढे मात्र होते 
उर्जेमध्ये इंधन भरलं जातं 
ते पुढे वर्षभर पुरलं तरी बास...

©Smita Raju Dhonsale
  *शीर्षक :-कौतुक वाढदिवसाचे*

मला वाटतं हा वाढदिवसाचा दिवस
तर आपला तसा रोजच असतो...
उगवणारा दिवस आंनंदाने घालवायचा बास...

वाढणाऱ्या दिवसाची उजळणी 
केकच्या उरावर मेणबत्त्या मांडून का व्हावी?

*शीर्षक :-कौतुक वाढदिवसाचे* मला वाटतं हा वाढदिवसाचा दिवस तर आपला तसा रोजच असतो... उगवणारा दिवस आंनंदाने घालवायचा बास... वाढणाऱ्या दिवसाची उजळणी केकच्या उरावर मेणबत्त्या मांडून का व्हावी? #मराठीकविता

58 Views