Nojoto: Largest Storytelling Platform

उगवते दर वर्षी स्वराज्याची पहाट पण केव्हा फिरेल स्

उगवते दर वर्षी स्वराज्याची पहाट
पण केव्हा फिरेल स्वातंत्र्याचे रहाट 

व्यापारी म्हणून आले व राज्यकर्ते बनले
स्वराज्यात बाजारू फिरस्ते कर्ते बनले

 बहुजन तेव्हा पण मानसिक होता गुलाम
आता तर शिकलेले पण घालतात सलाम

आता शिक्षण व्यवस्थेतून पिढी संपत आहे
वाघ सर्कशीत नाकर्त्या पुढे नाचत आहे 

पुन्हा एकदा क्रांतीची लाट उसळेल का
पुन्हा एकदा विर भगत संघर्ष करेल का

©Rajendrakumar Jagannath Bhosale
  #खंत