Nojoto: Largest Storytelling Platform

सुमे चल माझ्या शाळेला जाऊ ज्ञानोपासक पाहुण येऊ

सुमे चल माझ्या शाळेला जाऊ 
ज्ञानोपासक पाहुण येऊ 

शाळा माझं गाव 
ज्ञानोपासक त्याच नाव 
ज्ञानाची घागर भरुन घेऊ 1

ज्ञानोपासक माझी शाळा 
ज्ञानान भरलेला मळा 
नका रिकाम्या हातान जाऊ 2

पहा विज्ञानाचे रंग 
मुल रसायनात दंग 
थोडा जीवाचा रंग घेऊ (3

विद्वान विद्वत्तेची खाण 
गुरुजनाची प्रतिमा महान 
चला ज्ञानाची गाणी गाऊ 4

चित्रकला, रांगोळी, ध्यान 
दंगामस्ती, अनापान 
कला सा-या जगाला दावु 5

शाळा गुणवत्तेचा सागर 
अंधश्रध्देवर फिरवी नांगर 
उघड्या डोळ्यानं विज्ञान   पाहु(6)

दुर्गा देशमुख, परभणी

©Durga Deshmukh
  शाळा

शाळा #मराठीकविता

36 Views