Nojoto: Largest Storytelling Platform

नमन प्रतिभा कलेची असते एक निसर्गदत्त देणगी लिखाणा

नमन
प्रतिभा कलेची 
असते एक निसर्गदत्त देणगी
लिखाणाची मग 
मनात पेटते ठिणगी..!

शांत बसु देत नाही लेखणी
मनातील भाव प्रगट होतात
आपोआप मग ते 
कागदावर हळुच उमटतात! 

दु:ख असो वा वेदना
सुख असो वा आनंद 
लेखणीतुन व्यक्त झाले की
मनाला मिळतो स्वानंद! 

प्रतिभा अशीच तुमची 
बहरु द्या जिथेतिथे 
शब्दरुपी पाखरे
साहित्याचे आकाश करतील पालथे! 

मोहन सोमलकर

©Mohan Somalkar
  #गणेश