Nojoto: Largest Storytelling Platform

कधी कधी वाटतं एकांतात बसावं, निसर्गात रमावं, स्वतः

कधी कधी वाटतं एकांतात बसावं,
निसर्गात रमावं,
स्वतःशीच हितगुज करावं,
लोक परिक्षण करणाऱ्या लोकांमध्ये राहून आपण मात्र स्वतःचं आत्मपरीक्षण  करावे...
चढा- ओढ ,
हेवे - दवे,
रुसवे - फुगवे ही तर 
जगरहाटीच आहे
आपण मात्र त्यापलीकडे एक वेगळं जग निर्माण करावं...
स्वतःतला स्व बाजूला ठेऊन स्वतःला ओळखावं,
मनाला प्रेम आणि सौहार्दपूर्ण शांततेने सजवावे...
निसर्गात रमताना अहंकाराची पानगळ होताना पहावं,
कधी कधी वाटतं स्वतःशीच हितगुज करावं आणि हितगुज करताना अध्यात्मात स्व समर्पण करावं...
#Pournima
Mohol
Written on 27-05-2023 at 7.30 p.m.

©Pournima Mohol
  #walkalone