Nojoto: Largest Storytelling Platform

मनीची फजिती कपाटातल्या मेव्यावरती मनीमाउने स्वारी

मनीची फजिती

कपाटातल्या मेव्यावरती
मनीमाउने स्वारी केली
दुपार पाहुन सामसूम ती
दबके पाउल टाकत आली

थकुनी आई जरा झोपली
बाबा पेपरमध्ये गुंग
चिंगी, गोट्या पडवीमध्ये
पत्ते खेळत होते दंग

आजी पोथी वाचत बसली
हळूच तेव्हा मनी सटकली
खिडकीमधुनी घरात शिरली
स्वारी फडताळावर चढली.

फडताळावर चढता चढता
फुलपात्रांची चळत घसरली
वाट्यांचीही धांदल झाली
आई चिडून धावत आली.

गडबड ऐकुन मनी पळाली
काही नाही खैर म्हणाली
इकडुन तिकडे धावत सुटली
चिंगी गोट्या हसू लागली.

मान वाकडी करुन म्हणाली
उगाच का ही उठली आई
कपाटातला मेवा नाही
फटके उगाच बसले बाई.

©Archana Pol मनीची फजिती
मनीची फजिती

कपाटातल्या मेव्यावरती
मनीमाउने स्वारी केली
दुपार पाहुन सामसूम ती
दबके पाउल टाकत आली

थकुनी आई जरा झोपली
बाबा पेपरमध्ये गुंग
चिंगी, गोट्या पडवीमध्ये
पत्ते खेळत होते दंग

आजी पोथी वाचत बसली
हळूच तेव्हा मनी सटकली
खिडकीमधुनी घरात शिरली
स्वारी फडताळावर चढली.

फडताळावर चढता चढता
फुलपात्रांची चळत घसरली
वाट्यांचीही धांदल झाली
आई चिडून धावत आली.

गडबड ऐकुन मनी पळाली
काही नाही खैर म्हणाली
इकडुन तिकडे धावत सुटली
चिंगी गोट्या हसू लागली.

मान वाकडी करुन म्हणाली
उगाच का ही उठली आई
कपाटातला मेवा नाही
फटके उगाच बसले बाई.

©Archana Pol मनीची फजिती
archanapol5687

Archana Pol

New Creator

मनीची फजिती #poem