Nojoto: Largest Storytelling Platform

शब्द किमया.... शब्दांना इथे कवडीचीही किंमत नसते,

शब्द किमया....

शब्दांना इथे कवडीचीही किंमत नसते,
जे म्हणती असे त्यांना मोल कुठे कळते....

शब्दसंपदा भाषेची जपून वापरावी,
कंठातूनी केवळ मधुर वाणी शिंपडावी....

शब्दात ही किमया फुंकर घालायची,
शब्दात ही धार वचक दावण्याची...

शब्दालाही भावनेची असते किनार,
ओळ गुंफताना घ्यावा विवेकाचा आधार....

शब्दातील सामर्थ्य शब्दांनीच ओळखावे,
मनाशी सांगड घालून अभिप्रेत व्हावे....

शब्दाविना जीवनी होईल अर्थविण खेळ,
शब्द आहेत म्हणूनी होई संवादाचा मेळ....

शब्दावरील प्रेम कवितेने जागृत व्हावे,
अलवारपणे रसिकांच्या मनाचा ठाव घेऊनी जावे....

अमिता✍️

©Amita
  #शब्द