Nojoto: Largest Storytelling Platform
asj6456746298564
  • 54Stories
  • 47Followers
  • 620Love
    40.5KViews

Amita

poet

  • Popular
  • Latest
  • Video
5f11a3c02351cbffe0bc547ce1a33c5a

Amita

वाद-संवाद 

जिथे पेटतो वाद, तिथे संपतो संवाद
शब्दांची होते झुंज, टोकाचा होतो नाद....

अपेक्षांचा सलतो भार , आक्षेपांना येते उधाण
शब्दांनीच होतो वार, हरवतात मान- सन्मान....

अनावर अश्रूंचे निर्झर , स्त्रवतात पुन्हा झरझर
विरून जाता तो अंगार, मनावर फुंकर अलवार....

आयुष्याच्या सांजवेळी, गिळून टाक मीपण
मनात उरलेला संदेह , सोडवू प्रेमाने आपण....

अमिता✍️

©Amita
  #StandProud 
#मराठीकविता

StandProud मराठीकविता

99 Views

5f11a3c02351cbffe0bc547ce1a33c5a

Amita

किनारा

निरखुन अंतरंग तुझे, पुस प्रश्न स्वतःशी जरा....
शोध घेत आयुष्याचा, बघ सापडतो का किनारा?

प्रवाहात तुज कैक भेटले, किती उमजले? किती न सुटले ?
भुणभुण करी भयाण वारा, कोलाहल सारा...
बघ सापडतो का किनारा??

मनात वादळे कुशीत माया, पयोद उभा हा डोळ्यांतून सारा..
डगमगणाऱ्या वाटेवरती अश्रूंचा पसारा 
बघ सापडतो का किनारा??

जाळ्यात कशी तू गुंतुनी जाशी, स्वप्नांना का ठेवूनी उशाशी
अल्लड अवखळ मनात तुझिया, फुलवित जा पिसारा
बघ सापडतो का किनारा??

उत्तुंग गगनाची भीती कशाला, गहनता सागराची मापू कशाला 
विश्वस्त होता तूच तुला, उजळे मन गाभारा, 
बघ सापडतो का किनारा??

नयन रोखुनी दिसे किनारा, स्वप्नांच्या वेशी दिव्य मनोरा..
भयावरी मग मात करुनी, निघे शिडाचा डोलारा..
बघ सापडला किनारा, बघ सापडला किनारा....

अमिता🌸✍️

©Amita
  #Sea 
#marathi 
#MarathiKavita
5f11a3c02351cbffe0bc547ce1a33c5a

Amita

घन दाटून यावे..

घन दाटून यावे अन् बरसुन जावे
मनातील किल्मिष जसे ओघळावे....

घन दाटून यावे अन् बरसुन जावे
व्याकुळ मनाचे बांध फुटावे....

घन दाटून यावे अन् बरसुन जावे
ओशाळल्या धरेला बिलगून जावे....

घन दाटून यावे अन् बरसुन जावे
भान विसरुनी चिंब भिजून जावे....

घन दाटून यावे अन् बरसुनी जावे
सर्व पाशांतूनी  ऋणमुक्त व्हावे.....

अमिता🌸✍️

©Amita
  #rain 
#मराठीकविता

rain मराठीकविता

144 Views

5f11a3c02351cbffe0bc547ce1a33c5a

Amita

ग्रीष्म...

ग्रीष्माची साक्ष देतो, हा सूर्य तप्त होऊनी
वाराही तेव्हा रुसून बसतो, अज्ञात राहूनी....

किरणे प्रखरतात, धवल निळ्या नभातुनी
आतपाच्या रेषा तेव्हा, झेपावतात धरेवरी....

साध्वी मही सदैव, सामावून घेते ज्वाळा
वृक्षछायेत मिळतो, असीम शीत जिव्हाळा....

करपते काया,  स्वेद बिंदू स्त्रवतात
तृषार्त होता कंठ, ओंजळी पसरतात....

ग्रीष्म ऋतू हा असा, आगळा वेगळा
चटके सोसल्यावर, मग येतो पावसाळा....

अमिता✍️

©Amita
  #मराठीकविता 
#उन्हाळा
5f11a3c02351cbffe0bc547ce1a33c5a

Amita

#puraniyaadein 
#हिंदी
5f11a3c02351cbffe0bc547ce1a33c5a

Amita

Village Life लेखणीतूनी ......

वाटे मजला सारखे, पुन्हा पुन्हा जगावे 
प्रेम करावे शब्दांवर, अन् सुरात गीत गावे....

खळखळ जळात, पावले उसळून घ्यावी
मंजुळ गाणी गळ्यात, प्रीतीची गावी....

व्योमात विहंगथवा, एकटक बघावा
मोगरा कधीतरी, केसात सजवावा....

आयुष्य इतुके सुंदर, डोळ्यात साठवावे
काव्यात मनीच्या, उत्स्फूर्त प्रकट व्हावे....

अमिता✍️

©Amita
  #marathi 
#MarathiKavita
5f11a3c02351cbffe0bc547ce1a33c5a

Amita

राधा -- मुरारी

कुठे लोपला नाद वेणुचा 
कुठे हरपला वास हरीचा
विरून गेली कुठे निळाई
शोधून थकले ठाई ठाई 

गोकुळीचा श्रीरंग सखा 
हरवलास तू कुठे असा
लपंडाव नको रे सारखा
कासावीस झाली राधिका 

तेथूनी आली  हाक अंतरी
वास असे हरीचा चराचरी
वृथा जाहली कळकळ सारी
साक्षात उभा श्याम मुरारी....

अश्रु ओघळे गालावरती
रास रंगला राधेसोबती
विसरून मीपण भान हरपती
मीपण नुरले गोकुळीच्या धरती....

अमिता🌸✍️

©Amita
  #Kanha 
#marathi
5f11a3c02351cbffe0bc547ce1a33c5a

Amita

Life SMS  quotes in hindi शब्द म्हणजे....

शब्दांना पंख फुटले तर काय होईल 🕊️
उडून इकडे तिकडे विखरून जातील....
की हळुवार शिरतील कुणाच्या तरी कवितेत ?
आणि चपखल जागा घेतील एखाद्या ओळीत..
भावनांची झालर पांघरून शिरतील अलगद मनात ....
का अंगार बनून धुमसत राहतील कुठेतरी उगाच
कधी बोल बनून येतील गायकांच्या ओठी..
कधी प्राजक्त बनून उधळतील रसिकांच्या अंगणी..
कधी चंद्र होऊन आकाशात चांदणे न्याहळतील..
तर कधी उगाचच स्वप्नात येऊन जागे करतील..
शब्द नव्हे संचार, शब्द नव्हे विचार..
शब्द म्हणजे प्रेम की शब्द म्हणजे जाळ??
शब्द म्हणजे हत्यार आणि शब्द म्हणजेच आधार........
कुणाला कसा उमगेल तसाच तो शब्द!!!!

अमिता✍️

©Amita
  #शब्द 
#मराठीविचार

शब्द मराठीविचार

135 Views

5f11a3c02351cbffe0bc547ce1a33c5a

Amita

सूर्यस्वप्न .....
------------------------

मिहिराने पुसले हळूच निशेला,
भेटशील का ग तू मावळतीला....
मोहरून गेली निशा त्या हाकेला,
स्वप्नात रंगली दिनकराच्या ओढीला....

रंगूनी आभाळ, केशरी पूर्वसंध्येला
लगबगली पाखरे, जाण्यास कोटराला....
किरणे आतुरली आता, शर्वरीच्या आगमनाला
वाट पाहुनी अंधुकली, क्षण लागता ओसरायला....

तारकांचे पैंजण घालून, काजव्यांचे पदर ओढून
साजिरी निशा अवतरली, रातराणीचे अत्तर लेवून....
निशेलाहीे ठाऊक नव्हते, अकल्पित असे काही होते
तिच्या आगमनासमयी, तेज सारे लोपले होते....

काळोखाच्या गर्द गाभारी, हुरहूर लावून अंतरी
प्रश्न अनंत टाकूनी, कुठेसी विरला तो शौरी....
घटका सरता पहाटवारे, वाहू लागले माथ्याला
अरुणोदय होता पूर्वेला,  किलबिल झाली क्षितिजाला....

नकळत यामिनीच्या लोचनांनी, टिपले राजस सूर्याला
कर जुळता रजनीसूर्याचे, तम सर्वत्री लोपला....
एकरूपतेचा क्षण तो उज्वल,अवघ्या विश्वात रंगला
विभावरी विलीन होऊन, मिहिर तेजस्वी प्रकटला.....

अमिता🖋️

©Amita
  #sunrisesunset 
#मराठीकविता

sunrisesunset मराठीकविता

135 Views

5f11a3c02351cbffe0bc547ce1a33c5a

Amita

गारठ्यात पावसाच्या,
निजली सारी पाखरे
धुक्यातल्या वाटेत,
थिजली सारी अंतरे

भणाणत्या वाऱ्यात,
कापरं अंगात भरे
अवकाळी ऋतुला
ऊत येतो का बरे ?

--अमिता

©Amita
  #leaf 
#MarathiKavita
loader
Home
Explore
Events
Notification
Profile