Nojoto: Largest Storytelling Platform

मनाची हिरवळ आला मिरगाचा पाऊस झाली सगळीकडे हिरवळ

मनाची हिरवळ
आला मिरगाचा पाऊस 
झाली सगळीकडे हिरवळ 
फुलपाखरे भिर भिर करी 
झरे वाहाती खळखळ 

सुंदर हिरवी शाल पांघरून 
धरतीने केला साज श्रृंगार 
न्हाऊन निघाली धरती 
भेटीच तिच्या गुपित सार

 बाभळीला झाला भार 
पिवळा शालु नेसली 
घाल घाल पिंगा वा-या 
विनवणी करुन रुसली 

मोर नाचती पिवळ्या वनात 
थुईथुई करुन उघडे पिसारा 
कुठे हरणीचा दिसे कळप 
भेटीसाठी जीव व्याकुळ सारा 

येऊ नको तु दारावर 
पाऊस वहातो जोरात 
तुझे रुप साठविले 
माझ्या कोवळ्या मनात 

दुर्गा देशमुख

©Durga Deshmukh
  मनाची हिरवळ

मनाची हिरवळ #मराठीकविता

27 Views