Nojoto: Largest Storytelling Platform

जेव्हा शब्द मुके होतात तेव्हा लेखणीही थांबते डोळ


जेव्हा शब्द मुके होतात 
तेव्हा लेखणीही थांबते
डोळ्यातून व्यक्त होताच
लेखणीतील ओळ थेंब झेलते...
मुक्याच भावना साऱ्या 
व्यक्त होतात मुक्याने
पाट वाहतात मग 
मनातील अबोल ओझ्याने...
  नयन वाचून 
 अंतरंग मी लिहीत जाते
नीरव शांततेत स्वतःला ओळखत जाते
मनाशी मनाचा संवाद करत जाते...
मुक्या झालेल्या शब्दांना मग मनात येतो महापूर
झरा वाहतो मग शब्दांचा 
पण ओठांवर असते तरीही 
एक अबोल धून...

एक अबोल धून
जेव्हा शब्द मुके होतात......
#Pournima Mohol
11-06-2023.
04:00p.m.

©Pournima Mohol
  #merikHushi