Nojoto: Largest Storytelling Platform

अभंग जय महाकाल ॥ रुद्र अवतार॥ करे बेडापार॥ शीवशं

अभंग 

जय महाकाल ॥ रुद्र अवतार॥
करे बेडापार॥ शीवशंभो॥१॥

ओमकार तुच॥ तुच महादेव॥
 हे देवाधिदेव ॥ भोलेनाथ॥२॥

ज्योती लावियल्या॥ आहे निर्विकार ॥
 आमुचा आधार॥ शिवशंभो॥३॥

गजर कानात ॥ या उमापतीचा  ॥
 शिवशंकराचा ॥ रोज होई॥४॥

स्मशानी वास्तव्य॥  भस्म माथ्यावरी॥
तु त्रिनेत्र धारी॥  महादेवा ॥५॥

ध्यानस्थ तपस्वी॥ बस्थान बांधुनी॥
गंगा जटातुनी॥ तु काढितो ॥ ६॥

गळी शेषनाग ॥ हातात डमरु॥
तुच कल्पतरु॥ उमापती ॥७॥

मोहन सोमलकर 
🌺🌿©️®️🌺🌿


ईबुक साठी

©Mohan Somalkar
  #abc