Nojoto: Largest Storytelling Platform

स्वराज्य* आई भवानी आशिर्वाद पुत्र होऊ दे महान स

 स्वराज्य*
आई भवानी आशिर्वाद 
पुत्र होऊ दे महान 
सह्याद्रीचे नाव गाजविल 
महाराष्ट्राचा हो अभिमान ।।


शिवनेरीवर सूर्य चमकला 
बांधा सोन्याची तोरण 
जिजाऊंचे स्वप्न साकार 
निश्चित केली धोरण ।।

आई भवानी प्रसन्न झाली
शिवनेरीची शिवाणी ओठी
या मातीला मुक्त कराण्या 
शूरवीर पुत्र जन्म दे पोटी ।।

वेड लागले स्वराज्याचे 
गुलामीतून मुक्तीचा नारा
मावळे सारे सज्ज झाले 
आसमंत उसळला सारा ।।

आला तो सोन्याचा दिन
जिजाऊंची स्वप्न फळा आली
रयतेचा राजा शिवछत्रपती 
जगात स्वराज्याची घोषणा झाली

कु दुर्गा प्रल्हादराव देशमुख, परभणी

©Durga Deshmukh
  स्वराज्य

स्वराज्य #मराठीकविता

27 Views