Nojoto: Largest Storytelling Platform

झुंज जगण्याशी... शुष्क मन,नेत्र रिते, झरा प्रेमा

झुंज जगण्याशी...


शुष्क मन,नेत्र रिते,
झरा प्रेमाचा आटला.
कळेनाच पाहू कोठे, 
सारा अंधार दाटला.

धडपड अस्तित्वाची,
असे सोकावला काळ.
रेघ जाय पाहे मिटू,
झाले सुनेसुने भाळ.

व्यर्थ त्रागा मनाचाच,
भीती अनामिक एक.
दुष्टचक्र नियतीचे,
उणा भाग्याचा आलेख .

उत्कर्षाच्या सुर्यालाही,
कसे लागले ग्रहण?
आंधारून आले सारे,
असे पुढ्यात मरण.

विरजली नातीगोती,
करपला भावबंध.
वेदनेशी दुसऱ्याच्या
कोणी जोडेना संबंध.

झाली निष्ठुर नियती,
बळी निष्पाप चालले.
जीवघेण्या संकटाने,
सारे विश्वची हलले.

थरकाप उडवते
भेट अखेरची जशी
आटापिटा मनी चाले 
सुरू झुंज जगण्याशी.

             सुवर्णा शिवाजी वाघमारे
              शाळा कुरूळी झुंज जगण्याशी.
#WorldEnvironmentDay
झुंज जगण्याशी...


शुष्क मन,नेत्र रिते,
झरा प्रेमाचा आटला.
कळेनाच पाहू कोठे, 
सारा अंधार दाटला.

धडपड अस्तित्वाची,
असे सोकावला काळ.
रेघ जाय पाहे मिटू,
झाले सुनेसुने भाळ.

व्यर्थ त्रागा मनाचाच,
भीती अनामिक एक.
दुष्टचक्र नियतीचे,
उणा भाग्याचा आलेख .

उत्कर्षाच्या सुर्यालाही,
कसे लागले ग्रहण?
आंधारून आले सारे,
असे पुढ्यात मरण.

विरजली नातीगोती,
करपला भावबंध.
वेदनेशी दुसऱ्याच्या
कोणी जोडेना संबंध.

झाली निष्ठुर नियती,
बळी निष्पाप चालले.
जीवघेण्या संकटाने,
सारे विश्वची हलले.

थरकाप उडवते
भेट अखेरची जशी
आटापिटा मनी चाले 
सुरू झुंज जगण्याशी.

             सुवर्णा शिवाजी वाघमारे
              शाळा कुरूळी झुंज जगण्याशी.
#WorldEnvironmentDay

झुंज जगण्याशी. #WorldEnvironmentDay #poem