Nojoto: Largest Storytelling Platform
suvarnawaghmarea5205
  • 19Stories
  • 32Followers
  • 124Love
    0Views

Suvarna Waghmare/Alhat

  • Popular
  • Latest
  • Video
00c37779a25c0567c70c62e7d39b323b

Suvarna Waghmare/Alhat

पाथरवट..

शुष्क पाषाण फोडून 
शोधायचे स्वप्न कसे
स्वप्न माझीच फोडतो
नियतीचे फासे असे..

एक एक ठिकरी ही
तुकडेच भावनांचे
कुठे आहे वेळ मला
खुळे चोचले हे जिवाचे..

कातळाच्या ठिकऱ्यात
भूक दडली ओठाची
फोडून या पत्थराला
भरेन खळगी पोटाची..

दगडात जिणे माझे
हृदय ही पाषाणाचे
केले आहे बंद मीच
कवाड मुक्या भावनांचे..

बनवेन नवी वाट
फोडलेल्या पत्थराने
स्वप्न तुमची फुलू दे
दगड फोडतो घणाने..

माझ्यापरी जिवनात
स्वप्नहीन नको सावट
स्वप्न फोडून स्वप्न रचतो
तोच मी पाथरवट.

©Suvarna Waghmare/Alhat
00c37779a25c0567c70c62e7d39b323b

Suvarna Waghmare/Alhat

असंख्य रूपात नटली, नारीशक्ती खरोखरी
तिची गुणगाथा गाते, आज मी ही एक नारी
बापासम लेकराला,  जगवते  हीच नार
परिस्थितीला सामोरी, ना माने कधी हार.

सारे जग सारी क्षेत्रे,तिने पादाक्रांत केली
सौंदर्य नाविन्याची , शिखरे काबीज झाली
नारी शक्ती असे काय? हे त्यालाच कळले.
नारी जन्माचा ऋणात, ज्याने जीवाला जाळले.

नारी सरस्वती होते, ज्ञानदान करताना
वाचा शुद्धीची माधुरी, बुद्धीत भरताना
नारी लक्ष्मीचे रूप, घरा संपन्न ती करी
श्रमाचे देते मोल, संपत्ती तीच खरी.

पुराणांतरी वर्णियेली, नारी जन्माची कहाणी
देव हतबल झाले, त्यांनी घातली गाऱ्हाणी
देवतांच्या तेजातून, तेजोगोल प्रगटला
वेगळे अस्तित्व घेऊन ,काली रूपात नटला.

काली नामे नारीशक्ती, भिडे सदा असुरास
रक्तबीज चंड मुंड, शुंभ निशुंभ निपाःत
नका अबला समजू, क्षणी काली होते नारी
भरतारासही न सोडी, पडे जगावर भारी.

पुराणातही देवांनी ,नारीशक्तीस पुजले
नारी विना थांबे जन्म, हे त्यांनाही रुचले
जन्म देण्यास उदर,  दैवी वरदान तिला
आदिशक्ती बने माय, जन्म विश्वाला या दिला.

तू महाशक्ती चंडी, तुझ्या शक्तीला तू जाण
तूच ठेव आता जगी, तुझ्या अस्तित्वाचा मान
रण पेटले बाजूला, किती असुर मातले
रुप घेई चंडिकेचे ,आता आभाळ फाटले.

©Suvarna Waghmare/Alhat

13 Love

00c37779a25c0567c70c62e7d39b323b

Suvarna Waghmare/Alhat

महती पित्याची....

बाप माझा कसा वर्णू
माझे मलाच कळेना
शब्द मोडका जुळावा
व्यक्त करण्या ही भावना.

बाप आधाराचा वेळू
दोर काठिण्याचे किती
लटपटे पाय जरी
सावराया असे हाती.

पायाखाली होई वाट
ध्येयाप्रत नेण्यासाठी
बाप पायास आधार
सुखाकडे जाण्यासाठी.

बाप तमी कवडसा
आशरूपी किरणाचा
उजेडाच्या तिरीपिने
भरे गाभारा मनाचा.

बाप राऊळाचे द्वार
जागवितो शुध्दभाव
पावित्र्याचा हा निनाद
अंतराचा घेई ठाव.

कपारीचा लख्ख झरा
थंडगार समाधानी
बाप माझा असे जणू
गोड झऱ्याचे त्या पाणी.

बाप जागता पहारा
दारी आल्या आरिष्टला
करी कणखर मन
तोड नसे धारिष्टाला.

बाप तुझा अन् माझा
कधी नसतो वेगळा
लेकरांच्या प्रेमासाठी
जीव जाळतो सगळा.

©Suvarna Waghmare/Alhat #HappyDaughtersDay2020
00c37779a25c0567c70c62e7d39b323b

Suvarna Waghmare/Alhat

जाग रायगडा आली,तेव्हा स्वराज्य जागले
झाला गरीबांचा वाली , दुखः तयांचे भागले
पिचलेल्या जनतेला, भेटला वाली देव 
सारा शेतीचा वाचला, सारे भरले ते पेव
समाधानी गरीबाचा, एक मोती तेथे डुले
आंनदाने मोतीलग, कसा डौलाने तो हाले.

सावळा एक मोती ,असे सावळ्या सईचा
एका अबोल नात्याचा, अन् हताश आईचा
अपुऱ्या काळजाचा ,कुंकू भरल्या माथीचा
मन हेलावून जाई असा प्रेमाच्या साथीचा
या मोतियाने किती, दिले मायेचे स्पंदन
हाच मोती सल उरी,दुःख दिलेसे आंदण.

एक भरजरी मोती, शोभा टोपाची ती खास 
तोच भरजरी मोती ,आऊ जिजाईचा श्वास
त्याच मोत्याच्या आधारे, झाला स्वराज्याचा मेरु
तोच महामेरु मोती ,उभ्या स्वराज्या आधारु
त्या शुभ्र मुक्ताफळे, शिरी पेललासे भार
मोती मोलाचा ठरला, साऱ्या कर्तृत्वाचे सार.

एक मोती जन्मदाता, न  हाती गवसला
वणवण नशिबात, ना जागी तो थांबला 
भरजरी मोत्यालाही, तो धावता भेटला
कढ मनातच होता, नसे कधीच आटला
बळ रक्ताचेच मोठे, पराक्रम होता थोर
मोती शहाजी राजांच्या नावाचा, मनगटा दिला जोर.

उरलेले मोती याद, भरल्या घरांची
कुठे पडलेली ओस, दारे लढल्या वीरांची
त्या ओसाड दारांच्या, भावनांचे किती मोती
चालता डोलती, कथा शौर्याची सांगती
त्या चालत्या डौलात, जड राजांचे पाऊल
मोती कोरले मनात, विश्वासाची ती चाहूल.

राणीवसा तो मागचा, झाला सदा अश्वारुढ
मंत्रमुग्ध लेकरे ती, '*आबा*' शब्दाचे गारुड
धूळ लोट सदा पाठी,ना उसंत भेटली
गनिमी त्या काव्यात,सारी किमया साठली
त्या मुला लेकरांचा, पाठीवरल्या धुळीचा
असे मौलिक तो मोती, राणी वश्याच्या कुळीचा.

एक मोती डुले तिथे,खोल हृदयी डोहाचा
शंभूबाळ असे छावा, सह्याद्रीच्या सिंहाचा
मृत्यू ओशाळला येथे, होता थरारला काळ
झाला जिवलग मोती,आबांचा शंभू बाळ
त्या मोतियाने जडवला,शिरपेच स्वराज्याचा
मोती लगास झळाळ, बाळ शंभूच्या नावाचा.

एका एका मोतीयाने दिली, साऱ्याची ती याद
निरखला कौतुकाने, सारा मोतीलाग आज
त्या साऱ्याच मोत्यांना, वारंवार हे नमन
थोर अभिमान वाटे, जुळविता हे कवन
जिरेटोप हा असे ,पुढे पिढीला प्रेरणा
मोती लगाची ती ओढ, सदा भुलवेल मना.

©Suvarna Waghmare/Alhat #worldpostday
00c37779a25c0567c70c62e7d39b323b

Suvarna Waghmare/Alhat

 #worldpostday
00c37779a25c0567c70c62e7d39b323b

Suvarna Waghmare/Alhat

 #WatchingSunset
00c37779a25c0567c70c62e7d39b323b

Suvarna Waghmare/Alhat

नांगरलेले जीवन.

नांगराच्या या फाळाला 
बांधलेले हे जीवन
ढेकळात काळ्या काळ्या
कसे बसले रुतून..

खेळवावा वारा खोल
वाटे मनास या फार
जावे जीवन भरत
द्यावा काही अवसर

खालीवर करू माती
धसकट येई वरी
सारे काही  उलगडे
खोल रुतलेले जरी

फोडावीत ढेकळं ही
गर्व भरुन उरली
करू एकजीव सारी
शुद्ध हेतूने भरली

सरी पाडाव्यात रानी
जात्या मार्गाच्या तरल
नको वेड्यावाकड्या या
असू नयेत तरल.

खोल रुतावा नांगर
अमंगळ छेदण्यास
ठेवू शुद्ध बीजा जागा
दारिद्र्याला भेदण्यास

जीवनास सावराया
मन माती नांगरावी
कष्टवावे कर्तुत्वाला
यश शाल पांघरावी. #Bird

8 Love

00c37779a25c0567c70c62e7d39b323b

Suvarna Waghmare/Alhat

व्यापार जगण्याचा.....

व्यापार चाले जगण्याचा
मागणी सर्वांची सुखाची जिथे
काही फुकट मिळत नाही
किंमत मोजावी लागतेच इथे

सुख कोणी दिले जरी थोडे
हिशेब चोख द्यावाच लागतो
व्यापार तरी चालेल कसा ?
हिशेबाचा आधार घ्यावाच लागतो.

मागत नाही हिशेब आई
कधीच जागलेल्या रातींचा
प्रकाश नाही मागत कधीही
हिशेब जळणाऱ्या वातींचा

धरतीही कधी मागते का?
हिशेब अंगावरच्या घावांचा
पाणी नाही मागत कधीच
हिशेब जगवल्या जीवांचा

निसर्गाने तरी कधी ठेवला
लेखाजोखा का देण्याचा
हिशेब जर मागितला त्याने
असे घास का कोणाचा?

प्रियकर कधी इथे मांडतो
हिशेब गाठी भेटींचा
कृतघ्न बालक मांडून ठेवी
आधार दिलेल्या काठीचा.

निसर्ग मागत नाही हिशेब
म्हणून काय झाले!
हिशेब मांडून नेहमीच 
होतं का हो भले??

नियती नाही मागत काही
म्हणून का घेतचं राहायचं
आपणही जाणून घेऊन
थोडं नीट वागत राहायचं.

माणूस आहे चुकायचाच
चुकीतूनचं असतं शिकायचं
कुणासाठी बाजारात कधी
स्वप्न आपलं नाही विकायचं!

               सुवर्णा शिवाजी वाघमारे .
               शाळा - कुरुळी . #roshni

8 Love

00c37779a25c0567c70c62e7d39b323b

Suvarna Waghmare/Alhat

तू होशी रे पाऊस
तुष्ट धरा मी होईन
तू जा रे बरसत
मी भिजत राहीन...

तू वृक्ष हो छायेचा
मी होईन वल्लरी
बिलगेन अशी तुला
उंच जाईन मी खरी..

तू हो ना माझा कृष्ण
अलगुज मी होईन
नेई अधराशी मज
सुर प्रेमाचा गाईन..

तू होना वाटसरू
तुझी वाट मी होईन
जिथे जावे वाटे तुला
मी तुला रे नेईन..

दल कमळाचे होना
मी होईन रे भृंग
पाकळीत तुझ्या बंद
प्रेम दाविन उत्तुंग.

तू होना स्वप्न माझे
तुला डोळ्याने पाहीन
मिटू जाता पापणी ही
अश्रू बनून वाहीन..

काही झाला जरी तू रे
जग माझे व्यापू जातो
तुला पाहते मी जेव्हा
जीव खाली वर होतो

तू होना सागर निळा
तुझी लाट मी होईन
ऊर्मी घेईन तुझ्यात
गाज तुझीच गाईन.

तू होशी जरी व्योम
तुझी भव्यता पाहीन
खग बनून उडता
तुझ्या सवे मी राहीन.

तम किती हा दाटला
तू होशी दीप माझा
वात बनून जळेन
तुझी सोबत ही होता.

नको काही आता बनू
मी सोबत राहीन
प्रेम भरली ओंजळ
तुझ्या पायाशी वाहीन.

7 Love

00c37779a25c0567c70c62e7d39b323b

Suvarna Waghmare/Alhat

*विषय - मैत्री
मैत्री जीवनाचे द्वार,
मुक्त भावनांचा स्तर.
किती सांगू गुणगाण,
एक सुखाचे अस्तर.

मैत्री खुलविते तेज,
जोडी चैतन्य मनांचे.
वेडा जीवासाठी जीव,
तोडी बंधन जनांचे.

मैत्री असतो विश्वास,
घट्ट म्हणे सांधणारा.
असे एक धागा जसा, 
सुखदुःख बांधणारा.

जग विरोधी ठाकता, 
मैत्री पाठीशी राहते.
सम विचारांची धारा, 
दोन्ही डोळ्यांत वाहते.

मैत्रीमध्ये दोन जीव,
जरी असती वेगळे.
एक श्वास एक प्राण,
नाते जगाच्या आगळे.

स्फूर्तीचाच एक झरा,
मैत्री अखंड वाहता.
मैत्री दृढ होत जाते,
दुःख मित्रांचे साहता.

मन त्रयींच्या पल्याड,
नेते मैत्री जगण्याला.
घालतसे धरबंध,
चूक काही करण्याला.

जगण्यास वरदान,
दिले मानवास भले.
मैत्री नाव त्याचे सत्य, 
जणू ईश्वराने दिले. मैत्री
#Bestfriendsday

मैत्री #Bestfriendsday

3 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile