Nojoto: Largest Storytelling Platform

नको असतो प्रत्येक वेळी मला तुझा पैसा, तुझं स्टेटस,

नको असतो प्रत्येक वेळी मला तुझा पैसा, तुझं स्टेटस, तुझी संपत्ती तुझ पद मग काय हवं असतं मला.... नक्की काय अपेक्षित असतं मला आपल्या नात्यांला.... काय पाहीजे असतं मला तुझ्याकडून नक्की मला ही सांगता येणार नाही पण हवे असतात तुझे दोन शब्द जिव्हाळ्याचे.... हवी असते ती एक नजर प्रेमाची.... हवा असतो तो एक नजरेचा कटाक्ष खट्याळपणाचा.... तुझ्या केसात गुंतलेल्या मनाला तो गुंता ही आवडतो कारण तो असतो तुझ्याच विचारांचा.... थकलेलो असताना हवी असतात तुझ्या हातांची बोटे माझ्या केसात अन् तो हात माझ्या डोळ्यांच्या पापण्यावर.... कधी कधी घाबरतो मी या निर्दयी जगाला वाटतं तु म्हणावं अरे मी आहे ना तुझ्यासोबत आणि मग हवा असतो तो हात मला माझ्या खांद्यावर, धीर देण्यासाठी खूप एकाकी वाटत कधी, हिरमुसायला होतं, रडायला येतं तेव्हा मात्र हवा असतो तो हात माझ्या हातात आधारासाठी, चालायचं असतं तुझा हात हातात घेऊन त्या शांत रस्त्यावरून, अनुभवायची असते तुझी सोबत त्या झाडाखाली बसून.... कधी तरी एकांतात अनावर होणाऱ्या भावनांना पाहिजे असतो तुझा तो अलवार स्पर्श जो मोहरून टाकतो मनासोबतच शरीरालाही.... मला ही गरज असते तुझी, मला ही हवे असतात ते धुंद मंतरलेले क्षण तुझ्या सहवासाचे, तुझ्या सानिध्याचे मग हळूच शिरावेसे वाटते तुझ्या मखमली कुशीत अन् हरवून जावं वाटतं स्वतः ला.... काही क्षण हवे असतात आपल्या फक्त आपल्या जाणिवांचें.... त्या विलक्षण अनुभुतिचे.... जगाला विसरुन तुझ्यातच गुंतायच असतं, विरघळायचं असतं पण नाही व्यक्त करता येतं मला माझ्या भावनाना शब्दात.... वाटतं तु समजून घ्यावसं मी काहीच न बोलता.... ओळखावसं मनातलं फक्त नजरेतूनच.... कधीतरी घे ना मला ही समजून.... कधीतरी दे ना मला ही ती आश्वासक नजर मला बघून... तु ही विसर ना कधीतरी या जगाला.... ये ना कधी तरी मोकळ्या मनाने आणि हो ना एकरूप माझ्याशी.... माझ्या विचारांशी.... माझ्या भावनांशी.... कधीतरी माझ्यातल्या माझ्याशी....

-निल इमरोझ