Nojoto: Largest Storytelling Platform

थंड हवा, ढगाळ आकाश बरसल्या पावसाच्या सरी.. एक छत्

थंड हवा, ढगाळ आकाश
 बरसल्या पावसाच्या सरी..
एक छत्री, थोडा पाऊस
थोडी कॉफी आणि खारी..

भिजलेली ती भिजेलेला मी
खरंच फिलिंग ..लय भारी..
थोडंसं बोलत..थोडंसं लाजत,
असली आमची यारी..

स्पर्श होत चालताना
दुनिया बघायची सारी..
लाजत, हसत नाक मुरडत
अशी आपल्या भारताची नारी..

छत्रीत ती .. पावसात मी
पायी चालली होती वारी..
पाऊस थांबला, छत्री उडाली
निघालो आता माघारी...

निघालो आता माघारी..

©गोरक्ष अशोक उंबरकर
  छत्री अन् ती