Nojoto: Largest Storytelling Platform

आजही हवेत तिरंगा माझा अभिमानाने लहरत आहे.. तिरंग्य

आजही हवेत तिरंगा माझा
अभिमानाने लहरत आहे..
तिरंग्याची शान माझ्या
मनामनामधे बहरत आहे..

सीमेवर चा जवान माझा
जीव तोडून लढत आहे..
तिरंगा आज ही माझा
अभिमानाने वर चढत आहे..

माझ्या जवानाचं प्रेत बघुनी
एक आई आज रडत आहे..
रडणारी आईं ..उठ बाळा ऊठ म्हणून
तू फक्तं लढ म्हणत आहे .
तू फक्त लढ म्हणत आहे..

©गोरक्ष अशोक उंबरकर
  तिरंगा