Nojoto: Largest Storytelling Platform

धोती,चष्मा ,हाती काठी उच्च विचार राहणी साधी.. साथ

धोती,चष्मा ,हाती काठी
उच्च विचार राहणी साधी..

साथ सदा ते सत्याची देती
मार्ग अहिंसेचा जना सांगाती...

राष्ट्रपिता जन बापूंना म्हणती
मनात सदा ते आपुल्या असती..

शस्त्र अहिंसेचे घेऊन हाती
सत्याग्रहाचा मार्ग धरीती...

बापू असती देशाची शान
गांधी जयंती दिवस महान..

सौ वैशाली Y ✨💫

©Vaishali Yenugwar
  #बापू