Nojoto: Largest Storytelling Platform

सांगशील का रे कोरोना... तू कशासाठी आलास? हसतं खेळत

सांगशील का रे कोरोना...
तू कशासाठी आलास?
हसतं खेळतं गोकुळ सारं
ओसाड करून गेलास.

 आपुलकीनं वागणारी
माणुसकीला जागणारी
राहात होती माणसं इथं
त्यांच्यामध्ये येऊन तू...
त्यांनाच दूर लोटून गेलास
बोल की रे बाबा...
तू कशासाठी आलास.

 कित्येकांच्या नोकऱ्या गेल्या,
अनेकांची नाती तुटली.
उपासमारीन कळस गाठला,
कित्येकांची घरं लुटली.
 श्रीमंत गरीब, उच्च नीच
साऱ्यांची उडवुन दाणादाण 
तू साम्यवादी झालास
बोलावणं धाडलं नसताना कुणी
तू कशासाठी आलास?

 तुझ्या येण्यामुळे घरादाराची 
रया सारी गेली
कित्येक वर्षांची परंपरा अन्
आमची श्रद्धेची वारी गेली
इतकंच काय पण 
जन्मदात्यांच्या अग्निदानाचा
 हक्कही तू हिरावलास
 सांगशील काय रे कोरोना
तू कशासाठी आलास?
            - अतुल सोळस्कर. सांगशील का रे कोरोना...
तू कशासाठी आलास?
हसतं खेळतं गोकुळ सारं
ओसाड करून गेलास.

 आपुलकीनं वागणारी
माणुसकीला जागणारी
राहात होती माणसं इथं
सांगशील का रे कोरोना...
तू कशासाठी आलास?
हसतं खेळतं गोकुळ सारं
ओसाड करून गेलास.

 आपुलकीनं वागणारी
माणुसकीला जागणारी
राहात होती माणसं इथं
त्यांच्यामध्ये येऊन तू...
त्यांनाच दूर लोटून गेलास
बोल की रे बाबा...
तू कशासाठी आलास.

 कित्येकांच्या नोकऱ्या गेल्या,
अनेकांची नाती तुटली.
उपासमारीन कळस गाठला,
कित्येकांची घरं लुटली.
 श्रीमंत गरीब, उच्च नीच
साऱ्यांची उडवुन दाणादाण 
तू साम्यवादी झालास
बोलावणं धाडलं नसताना कुणी
तू कशासाठी आलास?

 तुझ्या येण्यामुळे घरादाराची 
रया सारी गेली
कित्येक वर्षांची परंपरा अन्
आमची श्रद्धेची वारी गेली
इतकंच काय पण 
जन्मदात्यांच्या अग्निदानाचा
 हक्कही तू हिरावलास
 सांगशील काय रे कोरोना
तू कशासाठी आलास?
            - अतुल सोळस्कर. सांगशील का रे कोरोना...
तू कशासाठी आलास?
हसतं खेळतं गोकुळ सारं
ओसाड करून गेलास.

 आपुलकीनं वागणारी
माणुसकीला जागणारी
राहात होती माणसं इथं

सांगशील का रे कोरोना... तू कशासाठी आलास? हसतं खेळतं गोकुळ सारं ओसाड करून गेलास. आपुलकीनं वागणारी माणुसकीला जागणारी राहात होती माणसं इथं #poem