Nojoto: Largest Storytelling Platform

तू समोर दिसली की मला बरं वाटतं.. माझं जगणं मला ते

तू समोर दिसली की
मला बरं वाटतं.. 
माझं जगणं मला
तेव्हा खरं वाटतं..

तू बोलली की 
शब्दांना ऐकावसं वाटतं..
ऐकताना तुझ्याकडे 
एकटक बघावसं वाटतं..

तू रडली की 
मला रडावसं वाटतं..
ओघळणाऱ्या आसवांना
अलगद पुसावसं वाटतं..

काय झालं कुणास ठाऊक
हल्ली बरच काही वाटतं..
प्रेमात पडलो तूझ्या
जणू असं काही भासतं ..

©गोरक्ष अशोक उंबरकर
  ..... वाटतं