Nojoto: Largest Storytelling Platform

स्वप्नओल्या पावसाने, काळजाला चिंब केले अधीरत्

स्वप्नओल्या पावसाने, काळजाला चिंब केले
     अधीरत्या या क्षणाने, ओले दव सुखावून गेले
    
     मोगराही खुलला, प्रिय हातांनी केसात माळता
    गाली खळीही उमगली, हळूच गोड लाजून जाता

     शिशिरातही जणू श्रावण नटता, सारे सोंदर्यमय
    मनाशी झालेलं एकरूप मन, सारच अस प्रेममय
     
     प्रेमभेटीच्या अखेर वाटेवरती डोळे हे पाणावले
    क्षणात जगुनी क्षण, आयुष्यभरासाठी सुखावले
 
     स्वप्नओल्या पावसाने, काळजाला चिंब केले
     अधीरत्या या क्षणाने, ओले दव सुखावून गेले

©Radhika
  #MarathiKavita #Marathipoem #Love #Prem #Bhet #prem_nirala_ #gajra #Kshan #Prem❤