Nojoto: Largest Storytelling Platform

नको वाटते भांडण तंटे मारामारी नको वाटते... कलागती

नको वाटते

भांडण तंटे मारामारी नको वाटते...
कलागतीची दुनियादारी नको वाटते!

कोते झाले विचार आता नव्या पिढीचे...
मायबाप ही जबाबदारी नको वाटते !

आपण दोघे दोन आपले सुखात राहू ...
परिवाराची भागीदारी नको वाटते!

सोडवतो मी पेपर सारे आयुष्याचे...
करणे काही पूर्वतयारी नको वाटते!

विठ्ठलास मी भेटत जातो वेळोवेळी...
भेटीसाठी पायी वारी नको वाटते!

जयराम धोंगडे, नांदेड

©Jairam Dhongade #friends
नको वाटते

भांडण तंटे मारामारी नको वाटते...
कलागतीची दुनियादारी नको वाटते!

कोते झाले विचार आता नव्या पिढीचे...
मायबाप ही जबाबदारी नको वाटते !

आपण दोघे दोन आपले सुखात राहू ...
परिवाराची भागीदारी नको वाटते!

सोडवतो मी पेपर सारे आयुष्याचे...
करणे काही पूर्वतयारी नको वाटते!

विठ्ठलास मी भेटत जातो वेळोवेळी...
भेटीसाठी पायी वारी नको वाटते!

जयराम धोंगडे, नांदेड

©Jairam Dhongade #friends