Nojoto: Largest Storytelling Platform

खोटा अंदाज होता वाळालेल्या त्या काडीला, हिरवळीचा

खोटा अंदाज होता 

वाळालेल्या त्या काडीला, हिरवळीचा साज होता 
पडणार आज पाऊस, खोटा अंदाज होता....
घडणार महायुद्ध त्या पाण्यावरुनी 
दंगल घडवली दगडांनी, रंगांचा माज होता...
पाठीवर बिऱ्हाड माझ्या वाकला ना कणा 
जीवनाचे सत्य अपेक्षांचा डोई काटेरी ताज होता...
सत्तेने मज अंध,बहिरा अन मुका केले 
इथल्या व्यवस्थेने दाबला आवाज होता...
बेरजेत ना मी कुणाच्या, झालो वजा ही नाही 
भागले मज गुणात, अकड्यांचा बाज होता...
 तत्त्वांनी पाहिले तत्व, पाहिले सत्त्वांनी माझे सत्व 
बुद्धाच्या पथावर भीमाचा समाज होता...
जगण्याने मज छळले, मरणाने ही टाळले 
स्वतःशी स्वतः हरणारा तो "बुद्धराज" होता....

बुद्धराज शशिकला अर्जुनराव गवळी 
९१७२२९१४४८

©Rajan Gawali
  #lonely