Nojoto: Largest Storytelling Platform

आयुष्यात काहीतरी हरवलंय जे आपल्याला हवं होतं.. हरव

आयुष्यात काहीतरी हरवलंय
जे आपल्याला हवं होतं..
हरवलेलं सगळं काही 
एकेकाळी आपल्याला नवं होतं ..

आता सगळे म्हणता खरे
जुनं ते सोनं होतं..
जुन्या एका पैश्यात ही
आजचं एक रुपयाचं नाणं होतं..

तडजोडीच्या जगण्यात ही 
जीवनाचं चांदणं होतं..
माणसाला माणूस म्हणून
एकमेकांच तेव्हा वागणं होतं ..

आवकाशात तारे असताना
जमिनीवर टिपूर चांदणं होतं..
पावसाच्या पहिल्या थेंबात
एकेकाळी मोरांचं ही नाचणं होतं..

एकेकाळी मोरांचं ही नाचणं होतं..

©गोरक्ष अशोक उंबरकर
  जुनं ते सोनं