Nojoto: Largest Storytelling Platform

वहीच्या प्रत्येक पानावर मी ही लिहीला असता बाप.. प

वहीच्या प्रत्येक पानावर 
मी ही लिहीला असता बाप..
पण तो रंगणार नाही..
खूप मोठं कर्तृत्व आहे त्याचं
या कवितेत तो मावणार नाही...

लिहायला शब्द असले जरी 
शब्दांना जागा पुरणार नाही ..
शाई पुरेपूर असली तरी
अंधारली रात्र उरणार नाही..

मिटले जरी डोळे त्याने
अस्तित्व कधीही मिटणार नाही...
बाप नावाची चादर माझी
सहजासहजी निसटनार नाही..

सुटले जरी बोट माझे
बाप हाथ माझा सोडणार नाही..
बापाबद्दल मी काय बोलावं
बाप शब्द कधीही संपणार नाही..

©गोरक्ष अशोक उंबरकर
  बाप