Nojoto: Largest Storytelling Platform

*जखम* एक जखम हृदयावर झेलून बघतो वावर दुःखाचे थोडे

*जखम*

एक जखम हृदयावर झेलून बघतो
वावर दुःखाचे थोडे तरी पेरून बघतो

झालीच आहे भावनांची गुंतवणूक तर
चला थोडं प्रेमातही पडून बघतो

बरेच सोसले तीचे चोचले अन् हिकमती
प्रेमासाठी लटक्याने तिच्याशी भांडून बघतो

छळले तीने मला आजवर  क्षणाक्षणाला
अंतिम समयी माझ्या मी तिला छळून बघतो

केले कैक वायदे निभवले कधीच नाही
मतलबी त्या सयेला कारण पुसून बघतो

*जयराम मोरे सोनगीर*

©jayram More
  जखम

एक जखम हृदयावर झेलून बघतो
वावर दुःखाचे थोडे तरी पेरून बघतो

झालीच आहे भावनांची गुंतवणूक तर
चला थोडं प्रेमातही पडून बघतो
jayramsitarammor5063

jayram More

New Creator

जखम एक जखम हृदयावर झेलून बघतो वावर दुःखाचे थोडे तरी पेरून बघतो झालीच आहे भावनांची गुंतवणूक तर चला थोडं प्रेमातही पडून बघतो #मराठीशायरी

67 Views