Nojoto: Largest Storytelling Platform

#OpenPoetry मी स्वत:शी हारलो खेळ झाला आसवांचा मी

#OpenPoetry मी स्वत:शी हारलो 

खेळ झाला आसवांचा
मी बिचारा नाहलो. 
काय बोलू? काय उरले? 
मी स्वत:शी हारलो. 

                      बोलताना जीभ अडली, 
                      मी असा थरकापलो. 
                      शब्दही मागे वळले, 
                      मन मला मी लाजलो. 
                      काय बोलू? काय उरले? 
                      मी स्वत:शी हारलो. 

ते दिलाशेमंद खचले, 
मी जरासा सांडलो. 
हसता माझं थोडं चुकलं, 
मी हदी ओलांडलो. 
काय बोलू? काय उरले? 
मी स्वत:शी हारलो. 

                      सार करतो सौख्य सारं, 
                      मी मला ना लाभलो. 
                      अर्थ सगळे व्यर्थ झाले, 
                      काळजाला कोसलो. 
                      काय बोलू? काय उरले? 
                      मी स्वत:शी हारलो. 

         ✍✍ - आदित्य चतुर्भुज #poetry #love #emotional #lifestory
#marathi #nojoto
#OpenPoetry मी स्वत:शी हारलो 

खेळ झाला आसवांचा
मी बिचारा नाहलो. 
काय बोलू? काय उरले? 
मी स्वत:शी हारलो. 

                      बोलताना जीभ अडली, 
                      मी असा थरकापलो. 
                      शब्दही मागे वळले, 
                      मन मला मी लाजलो. 
                      काय बोलू? काय उरले? 
                      मी स्वत:शी हारलो. 

ते दिलाशेमंद खचले, 
मी जरासा सांडलो. 
हसता माझं थोडं चुकलं, 
मी हदी ओलांडलो. 
काय बोलू? काय उरले? 
मी स्वत:शी हारलो. 

                      सार करतो सौख्य सारं, 
                      मी मला ना लाभलो. 
                      अर्थ सगळे व्यर्थ झाले, 
                      काळजाला कोसलो. 
                      काय बोलू? काय उरले? 
                      मी स्वत:शी हारलो. 

         ✍✍ - आदित्य चतुर्भुज #poetry #love #emotional #lifestory
#marathi #nojoto