Nojoto: Largest Storytelling Platform

आयुष्य : चला दोस्त हो आयुष्यावर बोलु काही मनामन

आयुष्य 
: चला दोस्त हो 
आयुष्यावर बोलु काही 
मनामनातील पडल्या गाठी 
मिळुन सारे खोलु काही 

माझ्या विरान आयुष्यात 
तु माझी तहान होऊन आलास 
माझी सोबत केलीस जन्माची 
युगे युगे तु माझाच झालास 

आईच्या बापाच्या रात्रंदिन कष्टात 
मुलांच्या भविष्याचे भाकित असतं 
म्हातारपणी आपली काठी व्हावी 
हेच त्याच्या आयुष्याच गणित असतं 

आयुष्य हे सुख दुःखाचा पेला 
आयुष्य हे रोज नवीन पडणारे कोडे 
आयुष्य हे तडजोडीचे माप 
आयुष्य हे वास्तविक आहे स्वप्न थोडे 

तुझ्या माझ्या आयुष्यात 
येईल आपल्या प्रेमाची पहाट 
शर्यत अजुन संपलेली नाही 
आज नाहीतर उद्या मिळेल वाट 

आयुष्याचे गणित मी चांगलेच शिकले 
मिळवता मिळवता काही वजा केले 
ह्दयातले होते ते संकटात धाऊन आले 
दिखाव्याचे रंग उडुन गेले 

आयुष्य खुप काही शिकवुन गेल 
पाण्यात राहुन सुसरीशी वैर 
तोंडचोपडे पणा करीत राहिले की 
शिव्या खाण्यात ही काहीच नसते गैर 

आयुष्य हे सर्कस मधील मंच असतो 
विदुषका प्रमाणे नाचायचे असते 
रंगी बेरंगी मुखवटे घालुन 
आपले पात्र वठवायचे असते 

आयुष्याचे अनेक रंग 
मी जवळुन पाहिले 
थकलेली माणसे 
शर्यतीत पळताना पाहिले 

दुर्गा देशमुख (9)

©Durga Deshmukh
  आयुष्य

आयुष्य #मराठीकविता

27 Views