Nojoto: Largest Storytelling Platform

नसले आयुष्यात काहीही तरी चालेल, फक्त जीवाला जीव

नसले आयुष्यात काहीही तरी चालेल, फक्त   जीवाला जीव देणारी   मित्र सोबत असावेत... नसला आयुष्यात मोठा बंगला तरी चालेल, आधार देणारे त्यांचे मायेचे हात असावेत... नसली महागडी गाडी तरी चालेल, पण     डोळ्यांना    नेहमी जवळची माणसं  आनंदी दिसावेत... नसले मोठे नाव आणि गाव तरी चालेल, त्यांचे थोर असे आशीर्वाद कायम असावेत... गरीब म्हणून जगणे हिणवले तरी चालेल, पण ही श्रीमंती माझ्याजवळ कायम टिकून असावी... देवळातील देव नाही भेटला तरी चालेल, पण माझी माणसं नेहमी माझ्या चांगल्या वाईट वेळेत माझ्या सोबत असावीत..x

©Madhuri
  #आई 
#aaibaba
#मैत्रीचेनाते