Nojoto: Largest Storytelling Platform

मोगरा मोगरा फुलला चेहरा खुलला मन वा-यावर झोपाळा

मोगरा
मोगरा फुलला 
चेहरा खुलला 
मन वा-यावर 
झोपाळा झुलला 

 मोगरा हसतो 
चेहरा दिसतो
मनात ठसतो 
ह्दयात बसतो 

मोग-याचा गंध 
सुटला सुगंध 
मनाचे रे बंध 
दाटला आनंद 

 मोगरा पहातो 
तुला विचारतो 
केसात माळतो 
गंधात बांधतो 

मोगरा रुसला 
एकटा बसला 
नाराज दिसला 
पाहुण हसला 

दुर्गा देशमुख

©Durga Deshmukh
  मोगरा

मोगरा #मराठीकविता

36 Views