Nojoto: Largest Storytelling Platform

भा.सा.व सां मंच नागपूर उपक्रम क्रमांक:- ३३३ उपक्र

भा.सा.व सां मंच नागपूर 
उपक्रम क्रमांक:- ३३३
उपक्रम विषय:- दुरावा
शीर्षक:- मोबाईल 

नात्यांची विण तुटली
संवाद मनातला खुंटला! 
दुरावला समाज सारा
गोतावळा सगळा सुटला! 

विचारपूस एकमेकांची
कोणी कोणाची नाही करत!
वेळ आता प्रत्येकाचा जातो
हाती मोबाईल सदा धरत!

  जीवनात प्रत्येकाच्या झाला
मोबाईल गळ्यातला ताईत!
त्याच्याविना जीवन अधुरे 
राहतो  कितीही असो घाईत!

त्याच्याशिवाय राहावेना
काय द्यावा पुरावा!
नवे नाते मोबाईलने जोडतो
रक्ताच्या नात्यात येतो दुरावा!

नाही आता पत्र लिहतो
कुणासोबत नसे भेटीगाठी! 
नाते रक्ताचे तुटले आता
कुणास मारावी मगरमिठी!

मैफिल ती चारचौघांची
दिसत नाही कुठे! 
सारा रिकामा वेळ जातो
मोबाईलमुळे वादळ उठे! 

मोहन सोमलकर नागपुर

©Mohan Somalkar
  #नाते