Nojoto: Largest Storytelling Platform

*आई माझी जिवंत आहे.* *आई* माझी जिवंत आहे. हो खरंच

*आई माझी जिवंत आहे.*

*आई* माझी जिवंत आहे.
हो खरंच... 
आई माझी जिवंत आहे.
प्राण तिचे नसले तरी,
शान तिची जिवंत आहे.
अस्तित्व तिचे नसले तरी,
मान तिचा जिवंत आहे. 
शरीर तिचे नसले तरी,
अंश तिचे जिवंत आहेत.
स्पर्श तिचा नसला तरी,
आवाज तिचा जिवंत आहे. 
वास्तविक ती नाही तरी,
शिकवण तिची जिवंत आहे.
ती पाठीशी नसली तरी,
आधार तिचा जिवंत आहे.
ती झाली गतप्राण तरी,
तिची आठवण जिवंत आहे.
पदर तिचा नसला तरी,
छाया तिची जिवंत आहे.
डोळ्यांनी ती दिसत नसली तरी,
माया तिची जिवंत आहे.
म्हणून मी म्हणतो तुम्हा..
आई माझी जिवंत आहे.. 
आई माझी जिवंत आहे.


                              *कवी* 
                *श्री.विशाल पैठणकर.*
            [ आईच्या स्मृतीला समर्पित ]

©Vishal G.Paithankar #kavita
#bhavanik kavita
#Aai
*आई माझी जिवंत आहे.*

*आई* माझी जिवंत आहे.
हो खरंच... 
आई माझी जिवंत आहे.
प्राण तिचे नसले तरी,
शान तिची जिवंत आहे.
अस्तित्व तिचे नसले तरी,
मान तिचा जिवंत आहे. 
शरीर तिचे नसले तरी,
अंश तिचे जिवंत आहेत.
स्पर्श तिचा नसला तरी,
आवाज तिचा जिवंत आहे. 
वास्तविक ती नाही तरी,
शिकवण तिची जिवंत आहे.
ती पाठीशी नसली तरी,
आधार तिचा जिवंत आहे.
ती झाली गतप्राण तरी,
तिची आठवण जिवंत आहे.
पदर तिचा नसला तरी,
छाया तिची जिवंत आहे.
डोळ्यांनी ती दिसत नसली तरी,
माया तिची जिवंत आहे.
म्हणून मी म्हणतो तुम्हा..
आई माझी जिवंत आहे.. 
आई माझी जिवंत आहे.


                              *कवी* 
                *श्री.विशाल पैठणकर.*
            [ आईच्या स्मृतीला समर्पित ]

©Vishal G.Paithankar #kavita
#bhavanik kavita
#Aai