Nojoto: Largest Storytelling Platform

प्राजक्ताचा सडा प्राजक्तताचा सडा पडला माझ्या ग

प्राजक्ताचा सडा 

प्राजक्तताचा सडा पडला 
माझ्या ग राज मंदिरी 
दारात टाकले रांगोळीचे पाट 
नेसली मी साडी चंदेरी ||१||

रुख्मीण माझी प्राण सखी 
स्वर्गातुन घेऊन आलो पारिजात 
सत्यभामाचे हलके कान भरले 
नारदाने कळ लावुन पेटविली वात ||२||

श्रीकृष्ण सापडला दोघीच्या पेचात 
काय करावे काहीच सुचेना 
सत्यभामा मागते तो पारिजात 
कसा काढावा यातुन मार्ग दिसेना ||३||

रुख्मीण मोठ्या मनाची राणी 
कृष्णाला संकटातुन काढले 
सत्यभामाच्या दारात लावा पारिजात 
फुले रुख्मीणी मंदिरी पाडले ||४||

असे हे झाड स्वर्गातील सुंदर 
हळवे, नाजुक, मुकुट सोनेरी 
हात लावता रंग ही देते 
शुभ्र वस्त्र धवल काया पाणेरी ||५||

दुर्गा देशमुख

©Durga Deshmukh
  प्राजक्ताचा सडा

प्राजक्ताचा सडा #मराठीकविता

27 Views