Nojoto: Largest Storytelling Platform

अगणित वेदनांचं हे वास्तविक आयुष्य त्यापेक्षा खूप

 अगणित वेदनांचं
हे वास्तविक आयुष्य
त्यापेक्षा खूप बरं
आपलं कल्पनेचं विश्‍वं...

असतात खूप व्यथा
वास्तविक जीवनाच्या
नसते दुःख कधी
जगात त्या कल्पनांच्या...

मनधरणी लागते करावी
वास्तवात इथे बर्‍याचदा
कल्पनेच्या विश्वात मात्र
सुखच लाभते खुपदा...

नसते वैर कुणाशी
जगात आपल्या कल्पनेच्या
वास्तविक जीवनात मात्र
वहावे लागते नदीत यातनेच्या...

म्हणूनच वाटते बरे
मला हे विश्‍व कल्पनांचे
कल्पकतेच्या आधारे
गुंफतो हार शब्द सुमनांचे...

©कविराज धनंजय
  #phool
#कल्पना_विश्व