Nojoto: Largest Storytelling Platform
nojotouser7971499356
  • 51Stories
  • 47Followers
  • 559Love
    1.4KViews

कविराज धनंजय

#My_poem_is_my_life_for_me,_and_I_sacrifice_my_whole_life_for_it.

  • Popular
  • Latest
  • Video
b7f051c55ff88e7c3f0e6dd0e0c7972a

कविराज धनंजय

कुणी येण्याचं सुख आणि
 कुणी जाण्याचं दुःख दोन्हीही क्षणिक असतात..
कारण साजरा केलेला आनंद, 
व्यक्त केलेले दुःख फक्त काही काळापुरते मर्यादित असते..!

©कविराज धनंजय
  #दुःख 
#कविराज_धनंजय 
#titliyan
b7f051c55ff88e7c3f0e6dd0e0c7972a

कविराज धनंजय

लोभ इतकाच माझा की
शब्दांची शब्दांशी जुळवणी करतो
चुकून होते मग त्यांची कविता
पण तरीही मीच का गुन्हेगार ठरतो...

©कविराज धनंजय
  #कविराज_धनंजय 
#phool
b7f051c55ff88e7c3f0e6dd0e0c7972a

कविराज धनंजय

नशिबाने जसा दिला तसा आकार घेत राहिलो मी,
खूप सांभाळून घेत होतो तरीही घसरत राहिलो मी,
कुणी विश्‍वास तोडला माझा तर कुणी मन,
पण लोक म्हणत राहिले की
बदलत चाललो मी..!

©कविराज धनंजय
  #मी
#कविराज_धनंजय 
#Khushiyaan
b7f051c55ff88e7c3f0e6dd0e0c7972a

कविराज धनंजय

देह दुःखाचा झाकून सदैव 
पांघरूण सुखाचे झाकत राहिला 
अनंत यातनांचे जरी उरात काटे 
तरीही बाप माझा मी हसताना पाहिला... 

होऊन आमचा आधारस्तंभ 
सर्वांच्या पाठीशी खंबीर उभा राहिला 
हरला जरी कित्येकदा तो 
डोळ्यात मात्र त्याच्या थेंब नाही पाहिला... 

सोडून स्वतःची स्वप्ने वार्‍यावर 
आम्हासाठीच तो आजवर झिजत राहिला 
नाही सोडला त्याने संयम कधीच 
निःस्वार्थपणे तो जगताना मी पाहिला... 

गेला दूर जरी देहाने आमच्यापासून
तत्वनिष्ठेने तो हृदयात आमच्या राहिला 
जळला जरी तो सरणावर आज 
पाणी डोळ्यातले आमच्या पुसताना मी पाहिला...

©कविराज धनंजय
  #बाप
#कविराज_धनंजय 
#FathersDay
b7f051c55ff88e7c3f0e6dd0e0c7972a

कविराज धनंजय


लई दिसाचं रान तान्हेल
जातंय करपून कोळशावाणी
ये रं पावसा ये रं पावसा
हाक आमची ऐक दीनवाणी..!

मिरोग संपून महिनाभर झाला
न्हाई अजून हित थेंब बरसला
अवस्था आमची केविलवाणी
ये रं पावसा ये रं पावसा
हाक आमची ऐक दीनवाणी..!

वाढवेळ झाला पेरणी उरकून
बिया बी येऊ लागल्या माती उकरून
आग ओकाया लागला सूर्य आगीवाणी
ये रं पावसा ये रं पावसा
हाक आमची ऐक दीनवाणी..!

कोठं कोठं म्हणे तू महापूर आणला
आमच्याच माथी का मग हा दुष्काळ हाणला?
बरसतुया तिकडं तू ढगफुटीवाणी
ये रं पावसा ये रं पावसा
हाक आमची ऐक दीनवाणी..!

©कविराज धनंजय
  #दुष्काळ 
#
#कविराज_धनंजय 
#KhulaAasman
b7f051c55ff88e7c3f0e6dd0e0c7972a

कविराज धनंजय

शांत सांजवेळी अंगणी
गंध पारिजातकाचा आला
सुमधूर तिच्या पैंजणाने
वाराही इथला हळूच शहारला...

©कविराज धनंजय
  #सांजवेळ 
#कविराज_धनंजय 
#KhoyaMan
b7f051c55ff88e7c3f0e6dd0e0c7972a

कविराज धनंजय

किनार्‍यावर समुद्राच्या
एकटाच सोबती एकांताच्या
असंख्य वेदना उरात घेऊन
बसलोय सानिध्यात निसर्गाच्या

©कविराज धनंजय
  #एकांत 
#कविराज_धनंजय 
#Ambitions
b7f051c55ff88e7c3f0e6dd0e0c7972a

कविराज धनंजय

आयुष्याच्या वेलीवर 
फुललेलं सुंदर फुल म्हणजे तू
त्या फुलातून वार्‍यावर
पसरणारा गंध म्हणजे तू..!

समुद्राला जशी साथ किनाऱ्याची
आधार तोच माझा म्हणजे तू
अंधार्‍या वाटेत इवलासा प्रकाश
देणारा तो काजवा म्हणजे तू..!

सुखासाठी निरपेक्ष राहून
दुःखातला हातातला हात म्हणजे तू
वाळवंटात पाय भाजताना
मिळालेला थंड गारवा म्हणजे तू..!

तूच माझे शब्द तूच माझा अर्थ
माझी प्रत्येक कविता म्हणजे तू
तुझ्यावीण नाही जीवन
सखे जीवन माझे म्हणजे तू..!

अशीच चिरंतन राहो आपली साथ
प्रत्येक क्षणाची सोबत म्हणजे तू
आस तू ध्यास तू, तूच माझा श्‍वासही 
जगण्यातला विश्‍वास म्हणजे तू..!

©कविराज धनंजय
  #तू 
#कविराज_धनंजय 
#KhoyaMan
b7f051c55ff88e7c3f0e6dd0e0c7972a

कविराज धनंजय

वेदनेत माझ्या काहींना
सुगंध अत्तराचा येत होता
चालले जात होते दुरूनच सारे
इतका प्रचंड गंध आसवात होता..

©कविराज धनंजय
  #वेदना 
#कविराज_धनंजय 
#Raftaar
b7f051c55ff88e7c3f0e6dd0e0c7972a

कविराज धनंजय

 कधीकाळी पावसाच्या
थेंबात तुझा सहवास होता
वार्‍याच्या झुळूकेवर
हृदयाचा माझ्या प्रवास होता

पडणार्‍या सरी जणू 
प्रेम होऊन बरसत होत्या 
हलकेच उमलणार्‍या कळ्या 
पावसात पहिल्या भिजत होत्या 

ओल्या मातीचा गंध लेऊन 
वाराही इथला गंधीत व्हायचा 
इंद्रधनूच्या सप्तरंगाने त्या 
आसमंतही सारा रंगीत व्हायचा 

प्रत्येक पाऊस पुन्हा नव्याने 
आजही त्या क्षणांना आठवून देतो 
भेटीगाठी दिन रातीच्या 
आजही मनात या पाठवून देतो

©कविराज धनंजय
  #पाऊस #आठवण 
#कविराज_धनंजय 
#raindrops
loader
Home
Explore
Events
Notification
Profile