*बाईपण रांधताना* *आयुष्याची होरपळ* *मुक्या वेदनेचं गीत* *उरी जपलेली कळ...* *चौकटीचा उंबरा* *येतां- जातांना ठोकर* *किती झिजलं तरीही* *कशी भरंना कसर?...* *वात पेटता कंदील* *घरं उजळून जाई* *काच सोसते चटके* *साऱ्यां दिव्याची नवलाई...* *जात्यामधल्या पाळीत* *आहे रोजचं दळण* *उखळांत भेगाळल्या* *भावमोत्यांचं कांडण...* *घुसळणं अंतरीची* *डोळां आसवं मंथन* *धागां विणते गोधडी* *सुख दुःखांचं सांधण...* *नंदादीप देवघरी* *जसा मंद तेवतसे* *तीळ तीळ जळतांना* *तरी ओठी हसू असे...* ©Shankar Kamble #बाई #स्त्रीजीवन #स्त्री #नारी #स्त्रीअस्तित्व #बाई #होरपळ #स्त्रीत्व #thought