Nojoto: Largest Storytelling Platform

ममतेचं आंदण आपुलकीचं गोंदण प्रेम फुलांचा सडा दारी

ममतेचं आंदण आपुलकीचं गोंदण
प्रेम फुलांचा सडा दारी असावा
घर असावं घरासारखं
सहवास तिथे परकेपणाचा नसावा...

असतील जितके तिथे बोलके
क्षणभराचाही त्यांच्यात अबोला नसावा
घर असावं घरट्यासारखं
किलबिलाट त्यात पाखरांचा असावा...

नकोत ते नुसतेच बोलके
शब्दात त्यांच्या आपलेपणा असावा
घर असावं बागेसारखं
नुसताच सजावटीचा दिखावा नसावा... 

असावी सजावट तिथेही 
अन प्रेमफुलांचा सदा बहर असावा
घर असावं घरासारखं
माणसामाणसात तिथे भेदभाव नसावा... घर असावं...
ममतेचं आंदण आपुलकीचं गोंदण
प्रेम फुलांचा सडा दारी असावा
घर असावं घरासारखं
सहवास तिथे परकेपणाचा नसावा...

असतील जितके तिथे बोलके
क्षणभराचाही त्यांच्यात अबोला नसावा
घर असावं घरट्यासारखं
किलबिलाट त्यात पाखरांचा असावा...

नकोत ते नुसतेच बोलके
शब्दात त्यांच्या आपलेपणा असावा
घर असावं बागेसारखं
नुसताच सजावटीचा दिखावा नसावा... 

असावी सजावट तिथेही 
अन प्रेमफुलांचा सदा बहर असावा
घर असावं घरासारखं
माणसामाणसात तिथे भेदभाव नसावा... घर असावं...

घर असावं... #poem