Nojoto: Largest Storytelling Platform

खिसा रिकामा असला तरीही कधी नाही म्हणाले नाही.. माझ

खिसा रिकामा असला तरीही
कधी नाही म्हणाले नाही..
माझ्या बाबांपेक्षा श्रीमंत
 आजवर कधी पाहिला नाही..

लेकरं उपाशी झोपताना 
डोळा त्याचा लागला नाही..
पोटाची खळगी भरताना 
बाप कधी थांबला  नाही..

दमून भागून आला तरी 
बाप कधी थकला नाही..
थकलेला बाप माझा
 निवांत कधी झोपला नाही..

थकलेला बाप माझा
निवांत कधी झोपला नाही..

©गोरक्ष अशोक उंबरकर
  बाप -